AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही एकनाथ शिंदेंच्या मुळावर उठलात; रामदास कदम यांचा मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप, पुरावे काय दिले?

रामदास कदम यांनी मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मनोज जरांगे आणि प्रसाद लाड यांच्यातील मैत्रीचे पुरावे देत, एकनाथ शिंदेंना संपवण्याचा विडा कोणी उचलला, असा सवाल रामदास कदम यांनी केला.

तुम्ही एकनाथ शिंदेंच्या मुळावर उठलात; रामदास कदम यांचा मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप, पुरावे काय दिले?
ramdas kadam Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 23, 2026 | 3:22 PM
Share

मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपवरून आता महायुतीतच राजकारण पेटलं आहे. रामदास कदम यांनी ऑडिओ क्लिपवरून थेट भाजपला लक्ष्य केलं. मनोज जरांगे आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत. आता मनोज जरांगे हे एकनाथ शिंदे यांच्या मुळावर उठलेत, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केलाय. परंतु जरांगे हे शिंदेंच्या मुळावर उठल्यावर मराठा समाज त्यांच्या मुळावर उठल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा रामदास कदम यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला.

रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मनोज जरांगे आणि प्रसाद लाड यांच्यातील मैत्रीचे पुरावे देत, भाजपमधून एकनाथ शिंदेंना संपवण्याचा विडा कोणी उचलला, असा सवाल रामदास कदम यांनी केला. रामदास कदम म्हणाले, ‘ मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाजाने डोक्यावर उचलून घेतलं होतं. परंतु हा माणूस सर्वांना फसवत आहे. त्याचे नाव टेंडर घोटाळ्याशीही जोडले जात आहे. एका बैठकीत त्यांनी एकनाथ शिंदे यांचे चमचे असा उल्लेख केला. त्यावेळी बाळासाहेब इंगळे यांनी तातडीने जाब विचारला. एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जात असाल, बैठकीत बाहेर जाऊ, असा इशारा त्यांनी दिला’.

‘आता क्लिपची तारीख, वेळ कशी मिळाली, असे विचारत आहेत. मराठा समाजाचे नेते एकनाथ शिंदे यांना संपवण्यासाठी… भाजपला हाताशी घेऊन…अनेक लोक भेटले, मंत्री आले. त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी आले. प्रसाद लाड तुमच्या जिवाभावाचे मित्र झाले. तुमची जिवाभावाची मैत्री झाली. त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून बसले. या क्लिपमध्ये 32 मिनिटे चर्चा केली. भाजप कशी वाढवायची, हे त्यात आले. जग खूप पुढे गेले. तुम्ही जमिनीवर आहात. मराठा समाजाला फसवत आहात. जातीजातीत भांडण लावत आहात. आता तुम्ही उघडे पडलात. हे औषध ओळखता का… तुमचा संबंध कधी याच्याशी आला का? तुम्ही उघडे पडला आहात. तुम्ही एकनाथ शिंदेंच्या मुळावर उठलात, तर मराठा समाज तुमच्या मुळावर उठल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही किती नाटके करा. तुमचं खरं रूप समोर आलं आहे.  मला विचारताय..की.. तुमच्याकडे ही क्लिप कधी आली..  माझा इतिहास काढा. ही क्लिप तुमच्या सहकाऱ्याने आणून दिली. त्यांना भेटा. तुमच्या नादाला कोणी लागत नव्हतं. पण तुम्ही बेभान झालात. परंतु 32 मिनिटांची क्लिप आल्यानतंर सगळं समोर आलं. त्यात दरेकरांचं नाव आलं आहे. त्याचं उत्तर भाजपला द्यावं लागेल’, असे ते पुढे म्हणाले.

Follow Us
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…
मराठवाड्याचं वाळवंट होईल, हे आधीपासून सांगत होतो - राज ठाकरे
Raj Thackeray : मराठवाड्याचं वाळवंट होईल, हे आधीपासून सांगत होतो; राज ठाकरेंचा दुष्काळावरून इशारा
AI चा बहाणा करू नका, सत्य बाहेर काढा; ऑडिओ क्लिपवरून जरांगे संतप्त
Manoj Jarange Patil : AI चा बहाणा करू नका, सत्य बाहेर काढा; कथित ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे पाटील संतप्त
जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की बनावट? देवेंद्र फडणवीस म्हणाले....
CM Devendra Fadnavis : जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की बनावट? देवेंद्र फडणवीस म्हणाले, संपूर्ण फॉरेन्सिक तपासणी...
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, तब्बल 1 लाख....
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, तब्बल 1 लाख 15 हजार 697 शेतकऱ्यांना मिळणार लाभ
7 महिन्यांपासून पगार नाही; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका
Pune : 7 महिन्यांपासून पगार नाही, 230 कामगार संकटात; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका