AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

3 Idiots Sequel Update: ‘3 इडियट्स’च्या सीक्वेलबाबत आमिर खानचा मोठा खुलासा; राजकुमार हिरानी काय करणार?

3 Idiots Sequel Update : आमिर खानचा नेक्स्ट प्रोजेक्ट कोणता असेल, त्याबद्दल चाहत्यांना उत्सुकता असून घोषणेचीआतुरतेने वाट बघत आहेत.याच दरम्यान खुद्द आमिर खाननेचे '3 इडियट्स' च्या सीक्वेलबद्दल मोठी माहिती दिली आहे.

3 Idiots Sequel Update: ‘3 इडियट्स’च्या सीक्वेलबाबत आमिर खानचा मोठा खुलासा; राजकुमार हिरानी काय करणार?
| Updated on: Oct 23, 2026 | 3:10 PM
Share

3 Idiots Sequel Update : बॉलीवूडच्या गल्ल्यांमध्ये सध्या शाहरुख खान याच्या अपकमिंग ‘किंग’ आणि सलमान खानच्या नव्या चित्रपटांबद्दल चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे आमिरचे चाहते देखील त्याच्या आगामी चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. ‘सितारे जमीन पर’ हा त्याचा मागचा चित्रपट गेल्या वर्षी, 20 जून 2025 ला रिलीज झाला. त्यानंतर आमिरच्या कोणत्याही नव्या प्रोजेक्टची ऑफिशिअल घोषणा झालेली नाही. याचदरम्यान आता आणमिर खानने त्याच्या ‘3 इडियट्स’ या चित्रपटाच्या सीक्वेलबद्दल मोठी अपडेट शेअर केली आहे. ज्यामुळे चाहते खूपच उत्सुक आहेत.

आमिर नुकताच, सिंगापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाला होती, तेव्हा त्याने त्याची सुपरहिट फिल्म ‘3 इडियट्स’ च्या सीक्वेलबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं. या मोस्ट अवेटेड फिल्मच्या स्क्रिप्टवर काम सुरू असल्याचं त्याने सांगितलं.

‘3 इडियट्स’ सीक्वेल बद्दल लेटेस्ट अपडेट ?

आमिर खानने सांगितलं की, दिग्दर्शक राजकुमार हिरानी सध्या या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत आहेत. तो परतल्यानंतर राजकुमार हिरानी त्याला या चित्रपटाची अंतिम कथा ऐकवतील. मात्र, याबाबत आताच अधिक काही सांगणं घाईचं ठरेल, असंही आमिरने स्पष्ट केलं. तरीही, चित्रपटाचं काम वेगाने पुढे जात असल्याचं त्याने नमूद केलं.

का इमोशनल झाला आमिर ?

खरं सांगायचं तर या फिल्म फेस्टिव्हलमध्ये आमिर खान भावूक झाला होता. मंचावर संवाद साधताना त्याने आठवण सांगितली की, कोविड-19 च्या लॉकडाऊनदरम्यान त्याला आयुष्यातील मागील वर्षांचा विचार करण्याची संधी मिळाली. “कोविडच्या काळात मी जेव्हा निवांत बसून विचार करत होतो, तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्या आयुष्यातील जवळपास 30 वर्षं निघून गेली आहेत. एखाद्या कामात एक-दोन किंवा पाच वर्षं पूर्णपणे झोकून देऊन काम करणं ठीक आहे. पण असं सलग 30 वर्षं करत राहिलात, तर याचा अर्थ तुम्ही तुमची नाती गमावली आहेत. आता मुलं मोठी झाली आहेत आणि ती त्यांच्या आयुष्यात व्यस्त झाली आहेत. त्यामुळे मला खूप मोठं नुकसान झाल्याची भावना जाणवली” असं तो म्हणाला.

3 इडियट्सची बॉक्स ऑफिसवरील कामगिरी कशी होती?

2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘3 इडियट्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला होता. राजकुमार हिरानी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाने कमाईचे अनेक मोठे विक्रम मोडले होते. त्या काळातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांमध्ये या चित्रपटाचा समावेश झाला होता. यामध्ये आमिर खान, शर्मन जोशी आणि आर. माधवन तसेच करीना कपूरची प्रमुख भूमिका होती.

Follow Us
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…
मराठवाड्याचं वाळवंट होईल, हे आधीपासून सांगत होतो - राज ठाकरे
Raj Thackeray : मराठवाड्याचं वाळवंट होईल, हे आधीपासून सांगत होतो; राज ठाकरेंचा दुष्काळावरून इशारा
AI चा बहाणा करू नका, सत्य बाहेर काढा; ऑडिओ क्लिपवरून जरांगे संतप्त
Manoj Jarange Patil : AI चा बहाणा करू नका, सत्य बाहेर काढा; कथित ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे पाटील संतप्त
जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की बनावट? देवेंद्र फडणवीस म्हणाले....
CM Devendra Fadnavis : जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की बनावट? देवेंद्र फडणवीस म्हणाले, संपूर्ण फॉरेन्सिक तपासणी...
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, तब्बल 1 लाख....
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, तब्बल 1 लाख 15 हजार 697 शेतकऱ्यांना मिळणार लाभ
7 महिन्यांपासून पगार नाही; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका
Pune : 7 महिन्यांपासून पगार नाही, 230 कामगार संकटात; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका
शिंदेसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना धक्का; मुलाचा पराभव अन् आणखी...
Dilip Lande : शिंदेसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना धक्का; मुलाचा पराभव अन् आणखी...