AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपमधून एकनाथ शिंदेंना संपवण्याचा विडा कोणी उचलला? शिंदे गट आक्रमक, रामदास कदमांचा थेट सवाल

मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक ऑडिओ क्लिप ऐकवली, या कथीत ऑडिओ क्लिपमध्ये जरांगे यांना देण्यासाठी शिंदेंनी भाजपकडून पाचशे कोटी घेतल्याचं म्हटलं होतं, त्यानंतर आता शिवसेना शिंदे गट चांगलाच आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे.

भाजपमधून एकनाथ शिंदेंना संपवण्याचा विडा कोणी उचलला? शिंदे गट आक्रमक, रामदास कदमांचा थेट सवाल
Ramdas KadamImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 23, 2026 | 3:09 PM
Share

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक ऑडिओ क्लिप ऐकवली.  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना देण्यासाठी भाजपकडून पाचशे कोटी रुपये घेतले, ते खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्फत देण्यात आले, असं या कथित ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं होतं. या ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विरोधकांकडून सरकारच्या कोंडिंचा प्रयत्न सुरू झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तर थेट एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या अटकेचीच मागणी केली आहे, तसेच या ऑडिओ क्लिपची इडीकडून चौकशी झाली पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील तसेच भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

एकनाथ शिंदे मोठा विश्वास ठेवून भाजपसोबत आले, आता भाजपलाही एकनाथ शिंदे यांची भीती वाटायला लागली आहे का? एकनाथ शिंदे यांना संपवण्याचा विडा भाजपमधून कोणी उचलला असा थेट सवालच आता रामदास कदम यांनी केला आहे. दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की,  कशा पद्धतीने भाजपचा प्लान चालतो, पैसे पक्षाकडून द्यायचे नाही पैसे परस्पर द्यायचे, तुमच्या प्रवीण दरेकर यांचं देखील नाव आलं आहे.  याचे उत्तर भाजपला सुद्धा द्यावे लागेल. एकनाथ शिंदे तुमच्या सोबत आल्यानंतर आता शिंदे यांची भीती तुम्हाला देखील वाटायला लागली आहे का? एकनाथ शिंदेंचा गळा कापण्याचं काम भाजपकडून होत आहे का असा प्रश्न आम्हाला पडत आहे.

त्या क्लिपची चौकशी झाली पाहिजे, यामागे कोण आहे? एकनाथ शिंदेंना बदनाम करण्यासाठी क्लिप काढून कटकारस्थान नेमकं कोण करत आहे? दूध का दूध पानी का पानी झालं पाहिजे.  मी स्वतः नरेंद्र मोदी, अमित शहा , मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं आहे. अस्थिनमधील   साप कोण आहे? हे समजलं पाहिजे,  एकनाथ शिंदेंना संपवण्याचा विडा भाजपमध्ये घेणारे कोण आहेत? हे लोकांसमोर आलं पाहिजे, असं यावेळी कदम यांनी म्हटलं आहे.

Follow Us
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…
मराठवाड्याचं वाळवंट होईल, हे आधीपासून सांगत होतो - राज ठाकरे
Raj Thackeray : मराठवाड्याचं वाळवंट होईल, हे आधीपासून सांगत होतो; राज ठाकरेंचा दुष्काळावरून इशारा
AI चा बहाणा करू नका, सत्य बाहेर काढा; ऑडिओ क्लिपवरून जरांगे संतप्त
Manoj Jarange Patil : AI चा बहाणा करू नका, सत्य बाहेर काढा; कथित ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे पाटील संतप्त
जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की बनावट? देवेंद्र फडणवीस म्हणाले....
CM Devendra Fadnavis : जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की बनावट? देवेंद्र फडणवीस म्हणाले, संपूर्ण फॉरेन्सिक तपासणी...
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, तब्बल 1 लाख....
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, तब्बल 1 लाख 15 हजार 697 शेतकऱ्यांना मिळणार लाभ
7 महिन्यांपासून पगार नाही; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका
Pune : 7 महिन्यांपासून पगार नाही, 230 कामगार संकटात; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका
शिंदेसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना धक्का; मुलाचा पराभव अन् आणखी...
Dilip Lande : शिंदेसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना धक्का; मुलाचा पराभव अन् आणखी...