
कांटा लगा या गाण्यात आपल्या सौंदर्याची जादू पसरवणारी शेफाली जरीवाला आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करतेय. या गाण्यानं शेफालीला रातोरात स्टार बनवलं होतं.

मात्र, बिग बॉस 13 चा भाग बनून शेफालीनं पुन्हा एकदा चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. बिग बॉसमध्ये शेफालीला चाहत्यांनी खूप पसंत केलं.

बिग बॉसपासून, ती चाहत्यांचं मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही. नुकतंच पुन्हा एकदा तिनं आपला ग्लॅमरस लूक सोशल मीडियावर दाखवला आहे.

शेफाली तिच्या ग्लॅमरस फोटोंच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट होण्याचं काम करते. आता तिने इन्स्टाग्रामवर निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये क्लिक केलेले काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. तिचा हा अवतार चाहत्यांच्याही पसंतीस उतरतोय.