
अभिनेत्री गौहर खान सध्या सुट्टी एन्जॉय करण्यासाठी पती जैद दरबारसोबत मालदीवला गेली आहे. ती मालदीवमध्ये धमाल करत आहे आणि सोशल मीडियावर फोटो शेअर करत आहे.

गौहरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिनं नुकतंच पिवळ्या रंगाच्या ट्रान्सपरंट शर्ट आणि पांढऱ्या पॅन्ट्समध्ये फोटो शेअर केले आहेत. हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

फोटो शेअर करत गौहरनं कॅप्शनमध्ये लिहिलं - सूर्य आणि वाळू.. मालदीव, मुसाफिर. फोटोंमध्ये ती बीचवर वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.

गौहरची ही स्टाईल तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहे. चाहते गौहरच्या फोटोंवर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका चाहत्यानं लिहिलं - आकर्षक. त्याच वेळी, एकाने पिवळ्या हृदयाचं इमोजी पोस्ट केला.

गौहरचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. हे फोटो आता चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहेत.