
‘हिचकी’ चित्रपटात राणी मुखर्जीनं नैना मधुर नावाच्या शिक्षिकेची भूमिका साकारली होती जी टॉरेट्स सिंड्रोम नावाच्या आजारानं ग्रस्त आहे. या आजारामुळे नैनाला बोलण्यात अडचण येते. अनेक शाळांमध्ये नाकारण्यात आल्यानंतर अखेर नैनाला एका शाळेत नोकरी मिळाली. मुलंही नैनाच्या आजाराची खिल्ली उडवतात. आता यात दाखवण्यात आलं आहे की, नैना मुलांना सांभाळणं आणि तिच्या समस्यांना सामोरे जाणे यामधील प्रत्येक गोष्ट कशी हाताळते.

‘स्टेनली का डब्बा’ हा चित्रपट अमोल गुप्ते यांनी दिग्दर्शित आणि निर्मिती केला आहे. या चित्रपटात स्टेनलीची कथा दाखवण्यात आली आहे, स्टेनली सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांना आवडतो. मात्र त्याच शाळेत एक शिक्षक आहे जो इतरांचे जेवणाचे डबे खाण्याचा शौकीन आहे. एक दिवस स्टॅन्ली त्याचा डबा घ्यायला विसरतो आणि मग शिक्षक त्याला बाहेर काढून टाकतात. या वादाच्या भोवऱ्यात असं एक सत्य समोर येतं की सर्वांनाच धक्का बसतो.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘ब्लॅक’ चित्रपटात राणी मुखर्जीनं एका अंध मुलीची भूमिका साकारली होती, जिचं तिच्या शिक्षकाशीही नाते आहे. या चित्रपटानं त्याच्या नावावर अनेक पुरस्कार केले होते.

नागेश कुकनूर यांचा चित्रपट ‘इकबाल’ हे दाखवतो की एक मुका आणि बहिरा इकबाल भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघात सामील होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कसा अडचणींना तोंड देत होता. इकबालची व्यक्तिरेखा श्रेयस तळपदेनं साकारली आहे. इकबालला त्याच्या प्रशिक्षकाचा पूर्ण पाठिंबा असतो, ज्याची भूमिका नसीरुद्दीन शाहनं साकारली आहे. हा चित्रपट शिक्षक दिनासाठी खास आहे.

‘तारे जमीन पर’ चित्रपटात अभिनेता दर्शील सफारीनं ईशान अवस्थीची भूमिका साकारली होती. आमिर खान दिग्दर्शित या चित्रपटाची कथा अमोल गुप्ते यांनी लिहिली आहे. चित्रपटाची कथा एका 8 वर्षांच्या मुलाची आहे जी डिस्लेक्सिया नावाच्या आजारानं ग्रस्त आहे. या आजारानं ग्रस्त असल्यानं त्याला अभ्यास करणं कठीण जातं. ईशानचे आईवडील त्याला समजून घेत नाहीत, मात्र नंतर निकुंभ अर्थात आमिर खान त्याच्या आयुष्यात येतो. निकुंभ ईशानला मदत करतो आणि त्याची प्रतिभा सर्वांसमोर आणतो.