
सध्या सर्वत्र नवरात्रीची धूम दिसत आहे. देवी आईच्या आगमनाचा हा सण उत्साहाने साजरा केला जात आहे.

आज (12 ऑक्टोबर) देशभरात उत्साहाने साजऱ्या केल्या जाणाऱ्या नवरात्रोत्सवाचा आज सातवा दिवस आहे. या दिवसांतील नऊ मानाच्या रंगांपैकी आज ‘लाल’ रंगाचा दिवस आहे.

सध्या नवरात्री हा सण जोशात साजरा केला जात आहे. या दिवसांत नऊ रंगांना विशेष स्थानं दिलं जातं. सगळ्या स्त्रिया या दिवसांत प्रत्येक दिवशीच्या रंगानुसार पेहराव परिधान करतात.

या खास निमित्ताने अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने खास लाल रंगाच्या साडीत फोटोशूट केले आहे. हे सुंदर फोटो स्वप्नील रास्ते यांनी शूट केले आहेत. 'दोघात तिसरा आता सगळं विसरा' या चित्रपटात ती मकरंद अनासपुरेसोबत सोबत दिसली होती.

तेजस्विनीने ‘बर्नी’, ‘चिनू’, ‘नो प्रॉब्लेम इन’ यासारख्या अनेक मराठी चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.