
मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) सतत चर्चेत असते. आता सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या तेजस्विनीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही हटके फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिचा घायाळ करणारा अंदाज पाहून चाहते थक्क झाले आहेत.

नुकतंच तेजस्विनीनं हे सुंदर फोटो शेअर केले आणि लगेच या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालायला सुरुवात केली. तिचा हा लूक तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.

तेजस्विनीने या फोटोशूटमध्ये ग्रे रंगाची साडी परिधान केली होती. सोबतच लाल रंगाची लिपस्टिक आणि केसांत लाल गुलाबांची फुलं, गळ्यात भरजरी हार, असा हा तिचा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

‘बघा... पण प्रेमाने!’ असं हटके कॅप्शन देत तिने आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सध्या तेजस्विनी पंडित तिच्या ‘अनुराधा’ या सीरीजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यादरम्यानच्या एका सोहळ्यात तिने हा लूक कॅरी केला होता.

आता तिचा हा सुंदर लूक सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेणारा ठरतो आहे. या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.