Sonakshi Sinha : ‘दबंग गर्ल’ची किलर अदा, पाहा सोनाक्षी सिन्हाचे हटके फोटो

‘दबंग’मध्ये काम करण्यापूर्वी सोनाक्षीचे वजन 90 किलो असायचे. हा चित्रपट साईन करण्यापूर्वी सलमानने सोनाक्षीला स्वतःचे वजन करण्यास सांगितले होते. यानंतर सलमानची आज्ञा मानून सोनाक्षीने तिचे वजन 30 किलोंनी कमी केले होते. सोनाक्षीचे रूपांतरण पाहून खुद्द सलमानलाही धक्का बसला होता. (The killer look of 'Dabangg Girl', see Sonakshi Sinha's amazing photos)

1/7
बॉलिवूडची ‘दबंग गर्ल’ अर्थात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानं नुकतंच एक सुंदर फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

2/7
सोनाक्षीनं 2010मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. सलमान खान अभिनीत ‘दबंग’ या चित्रपटातून सोनाक्षीला बरीच प्रसिद्धी मिळाली होती. या चित्रपटातील तिचा संवाद ‘थप्पड से दर्द नहीं लगा साहब, प्यार से लगता है’ बराच लोकप्रिय झाला होता.

3/7
शत्रुघ्न सिन्हा यांची कन्या असूनही सोनाक्षीने आपल्या मेहनतीने आणि कौशल्याने आपले नाव कमावले. तसेच, सोनाक्षी सिन्हा जशी एक उत्तम अभिनेत्री आहे, तशीच ती एक चांगल्या मनाची व्यक्ती देखील आहे.

4/7
सध्या ती आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान तिनं हे फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

5/7
‘दबंग’मध्ये काम करण्यापूर्वी सोनाक्षीचे वजन 90 किलो असायचे. हा चित्रपट साईन करण्यापूर्वी सलमानने सोनाक्षीला स्वतःचे वजन करण्यास सांगितले होते. यानंतर सलमानची आज्ञा मानून सोनाक्षीने तिचे वजन 30 किलोंनी कमी केले होते. सोनाक्षीचे रूपांतरण पाहून खुद्द सलमानलाही धक्का बसला होता.

6/7
सोनाक्षी शेवट 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दबंग 3’ या चित्रपटामध्ये दिसली होती. त्यानंतर ती इतर कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. सध्या तिच्याकडे एक मोठा प्रोजेक्ट आहे. ‘भुज द प्राईड ऑफ इंडिया’ या चित्रपटात ती दिसणार आहे. या चित्रपटात सोनाक्षीसह अजय देवगन, संजय दत्त आणि नोरा फतेही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचे वृत्त सध्या चर्चेत आहे.

7/7
आता तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. चाहत्यांच्याही ही फोटो पसंतीस उतरले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI