
जितेंद्र यांना बॉलिवूडचे जंपिंग जॅक असं म्हटलं जातं. त्यांच्या काळात जितेंद्र यांनी एकापेक्षा एक धमाकेदार चित्रपट दिले आहेत. त्यांच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत.

आता जितेंद्र हे पुन्हा तोच पराक्रम दाखवणार आहेत. लवकरच ते एकता कपूरसोबत काम करणार आहे. एकतानं स्वतः याबाबत माहिती दिली आहे.

ते शोमध्ये किंवा कोणत्या चित्रपटात दिसणार याबद्दल सध्या तरी कोणतीही माहिती मिळालेली नाही. तसे, ते यापूर्वी गेल्या वर्षी अल्ट बालाजीच्या बारिश या वेब सिरीजमध्ये दिसले होते.

त्यांनी बऱ्याच वर्षांनंतर ‘बारिश’मध्ये पुनरागमन केलं होतं. याआधी मात्र ते चित्रपटांमध्ये कॅमिओ म्हणून दिसले होते.

आता ही बातमी समोर येताच चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. चाहते प्रचंड आनंदीत आहेत.