
SIIMA अवार्ड्सला बाॅलिवूडसह साऊथच्या कलाकारांनी हजेरी लावलीयं. SIIMA अवार्ड्स बंगळुरू येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी अभिनेता अल्लू अर्जुन स्टायलिश लूकमध्ये दिसून आला.

SIIMA अवॉर्ड्स 2022 मध्ये अभिनेता विजय देवरकोंडाने जबरदस्त एंट्रीने मारली. लाईगर चित्रपटाच्या यशानंतर पहिल्यादांच विजय देवरकोंडा अवॉर्ड्सच्या कार्यक्रमामध्ये दिसला.

KGF स्टार यश आणि राधिका पंडित यांनीही SIIMA अवॉर्ड्सला हजेरी लावली होती. यावेळी दोघांचा लूक जबरदस्त दिसत होता. राधिका पंडितने साडी घातली होती आणि यामध्ये तिचा लूक सुंदर दिसत होता.

SIIMA अवॉर्ड्समध्ये रणवीर सिंहने शानदार एन्ट्री घेतली. रणवीर सिंह नेहमीच त्याच्या फोटो आणि कपड्यांमुळे चर्चेत असतो. अवॉर्ड्समध्येही रणवीरचा लूक खास होता.

अभिनेता कमल हासन यांनीही SIIMA अवॉर्ड्स 2022 मध्ये हजेरी लावली. कमल हासन यांचा लूक जॅकेटमुळे आकर्षक दिसत होता.