
बाॅलिवूड अभिनेते आणि अभिनेत्री चित्रपटांमधून तगडी कमाई करतात. मात्र, फक्त चित्रपट हा त्यांचा कमाईचा मार्ग नसून अनेक प्रकारे हे कलाकार पैसे कमावताना दिसतात. अनेक बाॅलिवूड स्टारचे मुंबईमध्ये मोठे हाॅटेल आहेत. विशेष म्हणजे त्यांची या हाॅटेलमधून धमाकेदार कमाई देखील होते.


बाॅलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही देखील करोडोंची मालकीन आहे. सुष्मिता सेन हिचे देखील मुंबईमध्ये हाॅटेल आहे. बंगाली माशी किचन असे सुष्मिता सेन हिच्या हाॅटेलचे नाव आहे. येथे अनेक बंगाली डिश मिळतात.

अभिनेता सुनिल शेट्टी याचे देखील मुंबईमध्ये अनेक बार, हाॅटेल आणि जिम आहेत. सुनिल शेट्टी बार H20, मिसचीफ रेस्टोरेंट आहेत. विशेष म्हणजे फक्त मुंबईच नाही तर मुंबईच्या बाहेरही सुनिल शेट्टीचे हाॅटेल आहेत.

बाॅलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस हिचे देखील मुंबई आणि श्रीलंकेत काही हाॅटेल असल्याची चर्चा आहे. जॅकलिन फर्नांडीस हिचे नाव सुकेश चंद्रशेखर प्रकरणात आल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला होता.