
नुकताच झालेल्या मुलाखतीत आशुतोष राणा यांनी सांगितलं की, रेणुका यांच्यासोबत लग्न कर... असा वडिलांकडून होत असलेल्या दबावानंतर लग्न 2 दिवसही टिकेल असं वाटलं नव्हतं. दिग्दर्शक रवी राय यांनी आशुतोष राणा यांना रेणुका यांचा फोननंबर दिला होता.

दिग्दर्शक रवी राय यांनी अभिनेत्रीचा फोननंबर दिला आणि रात्री 9 नंतर फोन करु नकोस... असं सांगितलं... पण आशुतोष राणा यांनी रेणुका यांना रात्री 10 वाजता फोन केला आणि दोघे जवळपास दीड तास फोनवर गप्पा मारत होते...

फोनवर गप्पा मारता-मारता आशुतोष आणि रेणुका यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर आशुतोष आणि रेणुका दिवसातून दोन-तीन वेळा फोनवर बोलायचे. दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली.. अखेर आशुतोष यांनी कवितेच्या माध्यमातून रेणुका यांचा प्रपोज केला...

आशुतोष यांनी लिहिलेली कविता रेणुका यांना आवडली नव्हती. अशात रणुका यांनी आशुतोष यांनी थांबवलं आणि प्रेमाची कबुली दिली... दरम्यान, दोघांचं लग्न एक महिना देखील टिकणार नाही... असं रेणुका यांचे मित्र त्यांना सांगायचे...

कारण दोघांचं कुटुंब फार वेगळं होतं. रेणुका मराठी तर, आशुतोष मध्य प्रदेश येथील आहेत... पण लग्नाच्या 23 वर्षांनंतर देखील आशुतोष आणि रेणुका एकत्र आहेत. आशुतोष आणि रेणुका यांना दोन मुलं देखील आहेत.