
अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अभिनेता अली फजल हे लग्न बंधनात अडकले आहेत. रिचा आणि अलीने मुंबईत रिसेप्शनचे आयोजन केले होते.

रिचा आणि अलीच्या रिसेप्शनला बाॅलिवूडमधील अनेकांनी हजेरी लावली. यावेळी रिचा आणि अलीचा जबरदस्त लूक दिसत होता.

या रिसेप्शन पार्टीमध्ये हृतिक रोशन आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद यांनीही हजेरी लावली होती. यावेळी सबाचा लूक सुंदर दिसत होता.

बॉलिवूड अभिनेत्री तब्बूही रिसेप्शनमध्ये पोहोचली होती. तब्बूने लेहेंगा घातला होता. तब्बूचा लूक यामध्ये सुंदर दिसत होता.

अभिनेत्री स्वरा भास्कर देखील या पार्टीत पोहचली होती. यावेळी स्वराने गुलाबी रंगाचा लेहेंगा घातला होता.