
टीव्ही इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी आमना शरीफ सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत आहे. आमना शरीफचं स्टाईल स्टेटमेंट आता बरंच बदललं आहे. नुकतंच आमनानं तिचे काही पारंपारिक लुकमधील फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये आमना कमालीची सुंदर दिसतेय. पारंपारिक लुकमध्येही आमना वेस्टर्न लूकेपेक्षाही सुंदर दिसतेय. आमनानं एक हिरवा लेहेंगा परिधान केला आहे. आमनाचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्याही पसंतीस उतरत आहेत.

आमना अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करते, तिचे चाहते या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पाडतात.

आमनानं आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात एकता कपूरच्या टीव्ही मालिका 'कहीं तो होगा' पासून केली होती. आमनाच्या अभिनयाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि ही मालिका हिट ठरली.

जेव्हा सिरियल शेवटच्या टप्प्यावर आली तेव्हा शोचा कलाकार राजीव खंडेलवाल याच्याशी आमनाचं नाव जोडलं गेलं. त्यांच्या अफेअरविषयी बरीच चर्चा झाली.