AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठरलं! अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना, या तारखेला रंगणार द्वंद्व

अंडर 19 वनडे वर्ल्डक स्पर्धेच्या साखळी फेरीतील सामने संपले. आता सुपर सिक्स फेरीचा थरार रंगणार आहे. या फेरीत भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने येणार आहेत.

ठरलं! अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना, या तारखेला रंगणार द्वंद्व
ठरलं! अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना, या तारखेला रंगणार द्वंद्वImage Credit source: ACC/Asian Cricket
| Updated on: Jan 24, 2026 | 8:19 PM
Share

अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात भारत न्यूझीलंड हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 7 गडी राखून पराभव केला आणि पाकिस्तानशी सामना करणार यावर शिक्कामोर्तब केलं. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1 फेब्रुवारीला सामना होणार आहे. कारण ब आणि क गटातील प्रत्येकी 3 संघांनी सुपर सिक्स फेरीत एन्ट्री घेतली आहे. यात ब गटातून भारत, बांग्लादेश, न्यूझीलंड आणि क गटातून झिम्बाब्बे, पाकिस्तान आणि इंग्लंडने एन्ट्री मारली आहे. असं असलं तर या गटात एक गणित होतं. भारताने न्यूझीलंडविरुद्धचा सामना गमावला असता तर पाकिस्तानशी लढत झाली नसती. पण हा सामना जिंकला आणि पाकिस्तानविरुद्ध सामना होणार हे ठरलं. त्यामुळे क्रीडारसिकांना पुन्हा एकदा  हायव्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. या सामन्यात नो हँड शेक पॉलिशी कायम असेल यात काही शंका नाही.

भारतीय संघ ब गटात होता आणि या गटात भारत, बांग्लादेश, न्यूझीलंड आणि अमेरिका हे संघ होते. भारताने या गटात तीन पैकी 3 सामने जिंकले आणि गटात अव्वल स्थान गाठलं. तर बांगलादेशने 3 पैकी 1 विजय, 1 पराभव आणि एक सामना ड्रॉ झाल्याने 3 गुणांसह दुसरं स्थान गाठलं. न्यूझीलंडचा संघ 3 पैकी एका सामन्यात विजय आणि दोन सामन्यात पराभूत झाला. यासह खात्यात 2 गुण होते आणि तिसर्‍या स्थानी राहीला. तर अमेरिकेचा संघ या स्पर्धेतून आऊट झाला. भारताने या गटात अव्वल स्थान राखलं आणि पाकिस्तानसोबत खेळणार हे स्पष्ट झालं. कारण क गटात पाकिस्तानचा संघ दुसऱ्या स्थानावर होता.

सुपर सिक्स फेरीत भारताचा इंग्लंडशी, पाकिस्तानचा बांगलादेशशी आणि झिम्बाब्वेचा न्यूझीलंडशी सामना होणार नाही. कारण हे संघ आपआपल्या गटात सारख्याच क्रमांकावर होते. त्यामुळे भारताचा पाकिस्तान आणि झिम्बाब्वेशी, बांगलादेशशचा इंग्लंड आणि झिम्बाब्वेशी, न्यूझीलंडचा इंग्लंड आणि पाकिस्तानशी सामना होईल. भारताचा 27 जानेवारीला झिम्बाब्वे, 1 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानशी सामना होईल. सुपर सिक्स फेरीत टॉपला असलेल्या दोन संघांना उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे नुसते दोन्ही सामने जिंकून चालणार नाही तर नेट रनरेटही चांगला ठेववा लागणार आहे.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...