एमआएमकडे एकनाथ शिंदेंचं गुपित काय? इम्तियाज जलील म्हटले तोंड उघडलं तर…
आज एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मुब्रामधील नवनिर्वाचित नगरसेवकांची भेट घेतली, त्यावेळी बोलताा त्यांनी मोठं विधान केलं आहे, जलील यांच्या या विधानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

सध्या मुब्रा येथील एमआएमच्या नगरसेविका सहर शेख या चांगल्याच चर्चेमध्ये आल्या आहेत. त्यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तिकीट नाकारण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी एमआयएममध्ये प्रवेश करून एमआयएमचं तिकीट मिळवलं, त्यांचा महापालिका निवडणुकीमध्ये विजय देखील झाला. दरम्यान विजय झाल्यानंतर कैसा हराया? असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना चांगलंच डिवचलं होतं, त्यांचा तो व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालं. दरम्यान त्यानंत त्यांनी मुब्राला हिरव करून टाकू अशा अशायाचं एक विधान केलं होतं, त्यावरून चांगलाच वाद पेटला, याच विधानावरून सहर शेख यांना पोलिसांनी नोटीस देखील पाठवली होती. त्यांनी आपल्या विधानावर माफी देखील मागितली अशी माहिती देखील समोर येत आहे. दरम्यान त्यानंतर आज एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मुंब्रामध्ये सहर शेख यांच्या सह सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी मोठं विधान केलं आहे.
नेमकं काय म्हणाले जलील?
आम्ही माफीनाम्याबद्दल सहर शेख यांना विचारलं होतं, त्यांना सांगितलं की माफी मागायची नाही. संपूर्ण पक्ष सहर शेख यांच्या पाठीशी उभा आहे. त्यांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं होतं की मुब्रा हिरवा करायचा आहे, जेव्हा गिरीश महाजन हे नाशिकमधील हिरवळ नष्ट करत होते, तेव्हा नाशिकमधील लोक एकत्र आले आणि म्हणाले साहेब आम्हाला नाशिक हिरवं हवं आहे, त्या दृष्टीकोणातून तुम्ही या विधानकडे का पहात नाहीत? आम्हाला मुब्रामधील सर्व समाजाच्या लोकांनी मतदान केलं, त्यामुळे आम्ही मुब्राच्या विकासासाठी काम करणार आहोत, असं यावेळी जलील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान त्यांनी यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. एकनाथ शिंदे म्हणतात की पूर्ण ठाणे भगवा आहे तर ते चालतं, आणि मी म्हणालो की मुंब्रा हिरवा आहे तर त्यात तुम्हाला प्रॉब्लम आहे, एकनाथ शिंदे यांनी आम्हाला सांगू नये, जर मी तोंड उघडले तर त्यांना देखील खूप प्रॉब्लम होतील, भाजप त्यांना कधी उचलून फेकेल याची त्यांनी चिंता करावी, असा हल्लाबोल यावेळी जलील यांनी केला आहे.
