PHOTO | राणा-अंजलीच्या प्रेमाची बातच न्यारी, हटके अवतारात दिसली ‘तुझ्यात जीव रंगला’ची जोडी!

| Updated on: Aug 14, 2021 | 1:47 PM

नुकतेच या मलिकेतील या प्रसिद्ध जोडीने एक नवे हटके फोटो शूट केले आहे. या फोटोशूटमध्ये दोघेही एका वेगळ्याच अंदाजात दिसले आहेत. या फोटोत अक्षया सुंदर साडीत तर, हार्दिक जोशी धोतर आणि कुर्ता अशा पारंपारिक लूकमध्ये दिसले आहेत.

1 / 6
छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतील अंजलीच्या भूमिकेमुळे अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) घराघरात पोहोचली. खरं तर अंजलीपेक्षा ‘पाठकबाई’ हीच तिला मिळालेली खरी ओळख.

2 / 6
राणादासोबत तिची ऑन स्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. अगदी काहीच महिन्यांपूर्वी ही मालिका ऑफ एअर गेली आहे. मात्र, तरीही चाहत्यांच्या मनातील ‘अंजली बाई’ आणि ‘राणा दा’ यांच्याबद्दलचे प्रेम तसूभरही कमी झालेले नाही.

3 / 6
मालिका आता ऑफ एअर गेली असली तरी प्रेक्षक आपल्या आवडत्या कलाकारांना खूप मिस करत आहेत. मालिका आता सुरु नसली, तरी मालिकेतील कलाकार देखील या मालिकेच्या गोड आठवणीत रममाण झालेले दिसत आहेत.

4 / 6
नुकतेच या मलिकेतील या प्रसिद्ध जोडीने एक नवे हटके फोटो शूट केले आहे. या फोटोशूटमध्ये दोघेही एका वेगळ्याच अंदाजात दिसले आहेत. या फोटोत अक्षया सुंदर साडीत तर, हार्दिक जोशी धोतर आणि कुर्ता अशा पारंपारिक लूकमध्ये दिसले आहेत. पारंपारिक अंदाज असला तरी, त्याला एक फॅशनचा नवा तडका लावण्यात आला आहे.

5 / 6
राणा दा’ साकारणारा अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी मराठी वाहिनीवर सुरु होत असलेली नवी मालिका ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?’ (Tuzhya Majhya Sansarala Aani Kay Hava) यात हार्दिक मुख्य भूमिका साकारणार असल्याचे कळते आहे.

6 / 6
अभिनेता हार्दिक जोशी आता ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ असं म्हणणार आहे. या मालिकेत नवोदित अभिनेत्री अमृता पवार मुख्य भूमिकेत दिसणार आहे.