AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हाचे नको ते फोटो व्हायरल करणाऱ्याला अटक; पण कोर्टाने खेळच पलटला

Sonakshi Sinha: काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने कोर्टाचे दार ठोठावले होते. आता या प्रकरणी कोर्टाने मोठा निर्णय घेतला आहे.

Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हाचे नको ते फोटो व्हायरल करणाऱ्याला अटक; पण कोर्टाने खेळच पलटला
SonakshiImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 15, 2026 | 11:44 AM
Share

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल प्रकरण चांगलेच चर्चेत होते. आता हे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल प्रकरणात दिल्लीतील आर्यन दीपक जैन याला वांद्रा पोलिसांनी अटक करून मुंबईतील कोर्टात हजर केले होते. मात्र, कोर्टाने अटकेच्या प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आरोपीला दिलासा दिला आहे.

पोलिसांनी आरोपीला दिल्लीहून अटक करून थेट मुंबईत आणले. दिल्लीतील स्थानिक मॅजिस्ट्रेट कोर्टात ट्रान्झिट रिमांडसाठी हजर न करता त्याला मुंबईत आणल्याने कोर्टाने ही प्रक्रिया बेकायदेशीर ठरवली. आरोपीच्या अटकेपूर्वी नोटीस न देणे तसेच अटकेची कारणे नोंदवण्याच्या बीएनएसएस कलम ३५ मधील तरतुदींचे पालन न झाल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले. पोलिसांनी आरोपीच्या तीन दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मॉर्फ फोटो तयार करण्यासाठी वापरलेले इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस शोधायचे असल्याचे कारण त्यांनी दिले होते. मात्र, कायदेशीर प्रक्रियेचे पालन करण्याचे पोलिसांना निर्देश देत कोर्टाने पोलीस कोठडीची मागणी फेटाळली आणि आरोपीला जामीन मंजूर केला.

या प्रकरणात सोनाक्षी सिन्हाच्या मॉर्फ केलेल्या अश्लील छायाचित्रांचा आणि व्हिडिओंचा अल्बम सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामुळे अभिनेत्रीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला असल्याचे सांगितले जात आहे. वांद्रे पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता आणि मुख्य आरोपी म्हणून आर्यन दीपक जैन याला अटक केली होती. कोर्टाच्या निर्णयामुळे अटकेच्या कायदेशीर प्रक्रियेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही अटकेपूर्वी कायद्यातील तरतुदींचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा अटक बेकायदेशीर ठरू शकते आणि आरोपीला दिलासा मिळू शकतो.

सध्या आरोपी जामिनावर मुक्त झाला असला तरी प्रकरणाचा तपास सुरूच आहे. पोलिसांनी आता कायदेशीर चौकटीत राहून पुढील कारवाई करावी लागणार आहे. सोनाक्षी सिन्हा प्रकरणाने डिजिटल माध्यमांतील अश्लील सामग्री आणि मॉर्फिंगच्या वाढत्या घटनांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे.

Follow Us
ऑपरेशन टायगरवर संजय राऊतांचं मोठं विधान; सत्तेच्या फेविकॉलमुळे हे....
Sanjay Raut : ऑपरेशन टायगरवर संजय राऊतांचं मोठं विधान; सत्तेच्या फेविकॉलमुळे हे....
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्रीच घेणार!
Jaykumar Gore : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्रीच घेणार! पहिलं अध्यक्षपद...; जयकुमार गोरेंचं मोठं विधान
पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? राजकीय....
NCP Politics : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला पूर्णपणे ब्रेक; पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
राऊतांच्या वाढदिवशी मुंबईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी
Sanjay Raut Birthday : संजय राऊतांच्या वाढदिवशी मुंबईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी; महाराष्ट्रभरातून आलेल्या समर्थकांकडून शुभेच्छांचा वर्षाव
सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले, तरी साईभक्तांची श्रद्धा कायम....
Shirdi Sai Baba Donation : सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले, तरी साईभक्तांची श्रद्धा कायम; वर्षभरात साईचरणी 14.5 किलो सोने आणि 255 किलो चांदी अर्पण
सशस्त्र माओवादापेक्षा दिमागी माओवाद अधिक धोकादायक; फडणवीसांचं विधान...
Devendra Fadnavis : सशस्त्र माओवादापेक्षा दिमागी माओवाद अधिक धोकादायक; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, असं का म्हणाले?
अंबरनाथमध्ये ब्लिंकिटची सेवा आठ दिवसांपासून ठप्प, पगार कपात अन्...
Blinkit Riders Strike : अंबरनाथमध्ये ब्लिंकिटची सेवा आठ दिवसांपासून ठप्प, पगार कपात अन्...; 100 ते 150 रायडर्सचा संप
टोरंट प्रकल्पासाठी कर्जतच्या 150 शेतकऱ्यांना नोटीस; 25 नोव्हेंबरला....
Karjat Torrent Power Project : टोरंट प्रकल्पासाठी कर्जतच्या 150 शेतकऱ्यांना नोटीस; 25 नोव्हेंबरला संयुक्त मोजणी
36 तासांनंतर मायक्रोसॉफ्टच्या सेवा पूर्ववत; कंपनीने ट्विट करत दिली....
Microsoft Services Outage : 36 तासांनंतर मायक्रोसॉफ्टच्या सेवा पूर्ववत; कंपनीने ट्विट करत दिली माहिती
लातूर जिल्हा बँकेसाठी आज मतदान; सहकार विरुद्ध परिवर्तन पॅनलमध्ये थेट..
Latur District Bank Election : लातूर जिल्हा बँकेसाठी आज मतदान; सहकार विरुद्ध परिवर्तन पॅनलमध्ये थेट लढत, दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला