
अभिनेत्री उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या चित्रविचित्र फॅशनमुळे चर्चेत असते.

उर्फी तिच्या बोल्ड अंदाजामुळे नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते आणि त्यामुळे तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो.

'बिग बॉस ओटीटी'मधून उर्फी सर्वांत आधी बाद झाली होती. तेव्हापासून ती तिच्या कपड्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली.

उर्फीचे काही लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये तिने चेन्सचा टॉप परिधान केला आहे.

'ताईंना कापून दिलेले सर्व कपडे संपले वाटतं, आता ज्वेलरी शो सुरू झाला', अशी कमेंट एका युजरने केली. 'तरीच ऑनलाइनवर कबुतराची जाळी आऊट ऑफ स्टॉक झाली आहे', असं दुसऱ्याने म्हटलंय.

'जे कपडे परिधान करून तुम्ही कम्फर्टेबल नसता, तेव्हा त्याला फॅशन म्हणता येत नाही', असाही टोला एका युजरने लगावला.

साखळ्यांचा टॉप आणि जाळीदार स्कर्ट असा उर्फीचा हा लूक आहे.

इंडस्ट्रीत माझा कोणीही गॉडफादर नसल्याने मला नेहमी ट्रोल केलं जातं, असं उर्फी एका मुलाखतीत म्हणाली होती.

उर्फी केवळ प्रसिद्धीसाठी अशा प्रकारचे कपडे परिधान करते, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.