
अभिनेत्री ट्विंकल खन्ना सध्या वयाची पन्नाशी, प्रेगनन्सी संदर्भात केलेल्या एका पोस्टमुळे चर्चेत आहे. पती अक्षय कुमार इंडस्ट्रीमधला आघाडीचा अभिनेता आहे. एकदा अक्षयच नाव एका अभिनेत्री सोबत जोडलं गेल्यानंतर ट्विंकल खन्ना प्रचंड चिडलेली.

अभिनेत्री असण्याबरोबरच ट्विंकल खन्ना एक लेखिका सुद्धा आहे. तिच्या पोस्ट सोशल मीडियावर अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. लग्नानंतर टि्वंकल हळूहळू चित्रपटांपासून दूर गेली.

अक्षय कुमार एकाबाजूला चित्रपटात व्यस्त होता. त्याचवेळी टि्वकल कुटुंब संभाळण्यात व्यस्त होती. या दरम्यान ट्विंकलला अक्षयसोबत काम करणाऱ्या एका सहअभिनेत्री बाबत समजलं. ट्विंकल तिच्यावर इतकी चिडलेली की, ती तिच्यावर हात उचलणार होती.

ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून प्रियांको चोप्रा होती. त्यावेळी अक्षय आणि प्रियांका अनेक चित्रपटात एकत्र काम करत होते. अक्षय-प्रियांकाने 'ऐतराज', 'मुझसे शादी करोगी' आणि 'वक्त: द रेस अगेंस्ट टाइम' या चित्रपटात एकत्र काम केलेलं.

एकत्र काम करतान अक्षय आणि प्रियांका जवळ आल्याच्या बातम्या आल्या. ज्यावेळी ही बातमी टि्ंवकल पर्यंत पोहोचली, त्यावेळी ती प्रचंड वैतागली होती. प्रियांकासोबत ट्विंकलच खूप भांडण झालं. त्यावेळी अक्षयने प्रेस स्टेटमेंट जारी करुन पुन्हा प्रियांकासोबत काम करणार नाही, म्हणून जाहीर केलं.