
व्हिडिओमध्ये पृथ्वी शॉ सोबत दिसणाऱ्या मुलीच नाव सपना गिल आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिला अटक केलीय. पृथ्वी शॉ चा या सपना गिलशी काय संबंध? कोण आहे ती? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील.

सपना गिल एक मॉडल आणि सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 2 लाख 18 हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

सपना तिचे फोटो आणि रील्स सोशल मीडियावर शेअर करत असते. मॉडल असण्याबरोबरच सपना एक अभिनेत्री सुद्धा आहे.

तिने भोजपुरी चित्रपटात काम केलय. वर्ष 2017 मध्ये काशी अमरनाथ आणि 2021 मध्ये आई मेरा वतन या दोन चित्रपटात तिने अभिनय केलाय.

काशी अमरनाथ चित्रपटात सपना भोजपुरी अभिनेता रवी किशन, दिनेश लाल यादव आणि अभिनेत्री आम्रपाली दुबेसोबत काम केलय. सपनाचा लुक खूप ग्लॅमरस आहे. आपले फोटो आणि व्हिडियोजमुळे ती नेहमीच चर्चेत असते.