
भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जी तिच्या स्टाईलची जादू चाहत्यांवर दाखवत असते. राणी नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

राणी स्वतःला फिट ठेवण्यासाठी जिममध्ये प्रचंड घाम गाळतेय आणि या दरम्यान ती खूप फोटोसुद्धा शेअर करत आहे.

अशा स्थितीत पुन्हा एकदा तिने तिच्या वर्कआउटच्या वेळचे काही फोटो इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये राणी चॅटर्जी वर्कआउट आउटफिटमध्ये दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर खूप आत्मविश्वास दिसत आहे.

राणीचे चाहते तिच्या बॉलिवूड पदार्पणाची वाट पाहत आहेत. सोबतच, राणी सलमान खानची मोठी फॅन आहे.