
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री जान्हवी कपूर अनेकदा सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करते. आता जान्हवी कपूरनं तिचे वर्कआऊट मोडमधीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

तुमचे लाडके कलाकार स्वत:ला फिट ठेवण्यासाठी दररोज वर्कआऊट करतात. काही कलाकार या वर्कआऊटची झलक आपल्या चाहत्यांना सुद्धा देत असतात.

जान्हवीचा हा अंदाज तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. तिचे हे फोटो आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

चाहत्यांनीही जान्हवीच्या या फोटोंवर प्रचंड कमेंट्स केल्या आहेत. जान्हवीनं या फोटोंमध्ये जान्हवीनं काळ्या आणि लाल रंगाचा वर्कआऊट ड्रेस कॅरी केला आहे.

जान्हवी अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी आहे. ती नुकतंच रुही या चित्रपटात अभिनेता राजकुमार रावसोबत धमाकेदार काम केलं आहे.