
आज जागतिक हृदय दिवस आहे. या निमित्ताने तुमचे हृदय निरोगी कसे ठेवायचे याबद्दल अनेक जनजागृती मोहिमा राबवल्या जातात. तरुणांमध्येही हृदयरोगाचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. चित्रपटसृष्टीतील कलाकारही यापासून दूर राहिलेले नाहीत. जास्त दारू पिणे, धूम्रपान करणे, खराब आहार, यांसारख्या कारणांमुळे आजकाल तरुणांमध्ये हृदयाशी संबंधित आजार उद्भवत आहेत. चित्रपट अभिनेतेही त्यांचे खाणे -पिणे एका ठराविक वेळेवर घेत नाहीत, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. आज आम्ही तुमच्यासोबत अशा फिल्मी व्यक्तिमत्वांची यादी शेअर करत आहोत ज्यांचे लहान वयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

या यादीतील सर्वप्रथम, अभिनेता सिद्धार्थ शुक्ला बद्दल बोलूया, ज्याचे या वर्षी 2 ऑक्टोबर रोजी निधन झालं. सिद्धार्थचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सिद्धार्थ फक्त 40 वर्षांचा होता. तो नेहमी त्याच्या आरोग्याबद्दल जागरूक होता आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवायचा. सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाने प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला की अशा तंदुरुस्त व्यक्तीला हृदयविकाराचा झटका कसा येऊ शकतो.

या वर्षी 30 जून रोजी मंदिरा बेदी यांचे पती आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते राज कौशल यांचे वयाच्या 50 व्या वर्षी निधन झाले. रात्री उशिरा त्यांना अस्वस्थ वाटले आणि रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. राज कौशल यांचंही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.

जेव्हा साऊथची सुप्रसिद्ध अभिनेत्री आरती अग्रवालचं निधन झालं, तेव्हा ती फक्त 31 वर्षांची होती. वयाच्या 16 व्या वर्षी चित्रपट जगतात पाऊल ठेवणाऱ्या या अभिनेत्रीने 6 जून 2015 रोजी जगाला निरोप दिला.

अमित मिस्त्रीने थिएटर, टीव्ही आणि चित्रपटांमध्ये काम केलं. या वर्षाच्या सुरुवातीला अमितचे वयाच्या 47 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

प्यार का दर्द है मीठा-मीठा, कुसुम सारख्या टीव्ही मालिकांमध्ये आणि खाकी, द लीजेंड ऑफ भगतसिंग सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेले अभिनेता अबीर गोस्वानी यांनी मे 2013 मध्ये जगाला अलविदा म्हटलं होतं. अबीर मरण पावला तेव्हा ते 37 वर्षांचे होता. ट्रेडमिलवर धावताना त्याला हृदयविकाराचा झटका आला.