
यामी गौतमची धाकटी बहीण सुरीली गौतम देखील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. सुरीली गौतम टीव्ही ते चित्रपटांपर्यंत प्रत्येक ठिकाणी दिसली. आज तिच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊयात.

सुरीली गौतमचा जन्म 1990 मध्ये झाला होता आणि ती यामीपेक्षा एक वर्षाने लहान आहे. सुरीलीनं टीव्ही इंडस्ट्री ते पंजाब फिल्म इंडस्ट्रीत काम केलं आहे. ती पंजाबी चित्रपटांची लोकप्रिय अभिनेत्री आहे.

यामी आणि सुरीलीचे वडील मुकेश गौतम हे पंजाबी चित्रपटांचे दिग्दर्शक आहेत. सुरीलीनं तिच्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात 'मीला दे रब्बा' या टीव्ही मालिकेतून केली होती.

यानंतर, सुरीली गौतमनं तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात पंजाबी फिल्म पॉवर कटपासून केली. सन 2020 मध्ये तिचा पोस्ती हा चित्रपट आला. याशिवाय तिनं अनेक प्रोजेक्टमध्ये काम केलं आहे.

सुरीली गौतमनं मोहालीच्या वायपीएसमध्ये शिक्षण घेतलं. चंडीगडच्या एसडी कॉलेजमधून तिनं पदवी संपादन केली. शिक्षण संपल्यानंतर सुरीली आपली बहीण यामीबरोबर राहण्यासाठी मुंबईत आली.

मुंबईत आल्यानंतर सुरीली गौतमनं इंडियन स्कूल ऑफ मीडियामधून मीडिया आणि इव्हेंट मॅनेजमेंटचा अभ्यास केला. यानंतरच तिनं अभिनयात पाऊल ठेवले.

सुरीली गौतमने 2013 साली जसराजसिंग भट्टीशी लग्न केलं. जसराज हा दिवंगत कॉमेडियन जसपाल भट्टीचा मुलगा आहे. सुरीली आणि जसराजचं पंजाबच्या चंदीगडमध्ये लग्न झालं होतं.