
‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’ फेम अभिनेता करण कुंद्रासोबत ब्रेकअप झाल्यापासून अनुषा दांडेकर सतत चर्चेत आहे. करणपासून विभक्त झाल्यानंतर आता अनुषा एका नव्या नात्यात अडली आहे. अशा परिस्थितीत अनुषा सध्या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय आहे.

सध्या ती सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. नुकतंच अनुषानं स्विमिंग पूलमधील काही फोटो शेअर केले आहेत.

फोटोमध्ये अनुषा काळ्या मोनोबिकिनीमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे प्रत्येक फोटोमध्ये ती वेगळ्या स्टाईलमध्ये मोज देताना दिसत आहे. अनुषाचे हे फोटो दिवसेंदिवस व्हायरल होत आहेत.

गेल्या वर्षी करण कुंद्रा आणि अनुषा दांडेकर यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली होती.

अनुषा दांडेकरनं पुन्हा सोशल मीडियावर फोटो शेअर करुन चाहत्यांना वेड लावलं आहे. तिचे हे फोटो चाहत्यांच्याही पसंतीस उतरले आहेत.