अभिजीत दिपके उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या मैदानात उतरणार? CJP ने दिलं स्पष्टीकरण, वाचा

अभिजीत दिपके उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ही चर्चा कॉक्रोच जनता पार्टीने फेटाळून लावली आहे.

| Updated on: Nov 16, 2026 | 11:52 AM
1 / 5
अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वातील कॉक्रोच जनता पार्टीने उत्तर प्रदेशातील  विविध जिल्ह्यात विस्तार केला आहे.  त्याचबरोबर कॉक्रोच जनता पार्टीने जवळपास 10 राज्यात पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.  विशेष म्हणजे उत्तर प्रदेशात पुढील काही महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत.

2 / 5

अभिजीत दिपके हे राजस्थान, पश्चिम बंगाल, हरियाणा, झारखंड, जम्मू काश्मीर, बिहार, उत्तराखंड, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, ईशान्य भारतात पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. यात सर्वात मोठी सदस्य समिती ही उत्तर प्रदेशची आहे.

3 / 5

अभिजीत दिपके यांच्या सीजेपीने विधानसभा मतदारसंघानुसार कार्यकर्त्यांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. सीजेपीने उत्तर प्रदेशमध्ये हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे.

4 / 5

कॉक्रोच जनता पार्टीने विधानसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. सीजेपीने स्पष्ट केलं की, आमचा पॉलिटिकल प्रेशर ग्रुप आहे. याही पुढे आमची भूमिका अशीच सुरू राहील. भविष्यात देखील आमची राजकीय पक्ष स्थापन करण्याची इच्छा नाही'.

5 / 5

अभिजीत दिपके यांनी देखील याआधी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. परंतु कॉक्रोच जनता पार्टी सातत्याने सत्तेविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us