Abhijeet Dipke: अभिजीत दीपकेंचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल, याचं फंडिंग…

Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी नुकताच टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आहे.

| Updated on: Aug 15, 2026 | 7:42 AM
1 / 5
कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दीपके हे दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर चांगलेच चर्चेत आहे. आता त्यांनी ग्रामिण भागातील शाळांवर काम करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, टीव्ही 9 मराठीशी साधलेल्या संवादामध्ये त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावले आहे.

कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दीपके हे दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर चांगलेच चर्चेत आहे. आता त्यांनी ग्रामिण भागातील शाळांवर काम करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, टीव्ही 9 मराठीशी साधलेल्या संवादामध्ये त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावले आहे.

2 / 5

अभिजीत दीपके यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्र्‍यांनी तिरंगा यात्रा काढली, या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला होता असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देत अभिजीत दीपके यांनी थेट मुख्यमंत्र्यांना सवाल केला आहे.

3 / 5

"चांगली गोष्ट आहे तिरंगा यात्रा काढली मात्र जे बॅनर लावण्यात आलेत दर 40 50 फुटावर बॅनर लावले त्याला किती खर्च झाला असेल आणि तो खर्च कुठून आला. तुम्ही आमच्या फंडिंग बाबत प्रश्न विचारत होते आज पूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये शेकडो बॅनर लागले याची फंडिंग कुठून आली" असे अभिजीत दीपके म्हणाले.

4 / 5

पुढे ते म्हणाले की, "एवढा खर्च तुम्ही बॅनर वर करताय हाच खर्च तुम्ही शाळावर केला असता ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणावर केला असता तर चांगलं झालं नसतं का? तुम्हाला फक्त चेहरे चमकवायचेत की मुलांचं भविष्य घडवायचं याचा पण विचार केला पाहिजे."

5 / 5

अभिजीत दीपके यांनी क्या बोलती पब्लिकची तयारी सुरु असल्याचे सांगितले आहे. "आमचं संघटन बनत आहे आणि राज्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ते ही सुरु करु. कुठे ना कुठे लोकांना कळालेलं आहे की या विषयावर बोलायला लागेल. कारण बोलल्या शिवाय होणार नाही आणि जो पर्यंत सरकारला प्रश्न विचारणार नाही हे सरकार, मग ते कोणाचेही असू देत, कोणतेही राज्य असू देत आणि कुठलाही पक्ष असू दे देशाच्या ग्रामिण भागातल्या शाळा पाहिल्या तर कोणीच त्याच्यावर काम केलेलं नाही आणि आता गरज आहे काम करण्याची. प्रश्न विचारुन आपण सरकारला काम करायला लावू शकतो." असे ते म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us