
भारती सिंह ही गेल्या कित्येक वर्षांपासून लोकांना हसवण्याचे काम करत आहे. व्लॉगच्या माध्यमातून आपले खासगी आयुष्यही शेअर करताना भारती सिंह दिसते.

भारती सिंह ही सध्या लाफ्टर शेफला होस्ट करताना दिसत आहे. नुकताच भारती सिंह हिने सेटवरील सर्व मुलांना राख्या बांधल्या आहेत.

यावेळी भारती सिंह ही अंकिता लोखंडे हिचा पती विकी जैन याला देखील राखी बांधताना दिसली. यावेळी तिने एक मोठी गोष्ट विकी जैन याच्याकडे मागितली.

भारती सिंह म्हणाली की, विकी भैय्या मला फक्त एक कोळशाचा ट्रक पाठून द्या. भारतीचे हे बोलणे ऐकून सर्वजण हसताना दिसले.

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या घरी लवकरच बाळाचे आगमन होणार असल्याचे सांगितले जातंय. याचा एक व्हिडीओही व्हायरल होताना दिसला.