
कॉमेडियन कपिल शर्मा हा कायमच चर्चेत असतो. कपिल शर्माची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. सोशल मीडियावर कपिल शर्मा सक्रिय देखील असतो.

विशेष म्हणजे कपिल शर्मा याने आपल्या करिअरमध्ये अनेक चढउतार देखील बघितले आहेत. आज कपिल शर्मा हा कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे.

विशेष म्हणजे म्हणजे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंजाबहून ज्यावेळी कपिल शर्मा मुंबईत दाखल झाला, त्यावेळी त्याच्याकडे काहीच नव्हते.

आज मुंबईच्या अत्यंत महागड्या परिसरात कपिल शर्माचे आलिशान असे घर आहे. द कपिल शर्मा शोमधून कपिल शर्माने बक्कळ पैसा कमावलाय.

रिपोर्टनुसार कपिल शर्मा याच्याकडे 280 कोटी संपत्ती आहे. यासोबतच मुंबईसह पंजाबमध्येही त्याची मालमत्ता आहे. कपिल शर्मा सध्या त्याच्या नव्या शोमुळे चर्चेत आलाय.