कोरोनाची नवी लाट आली? चीनसह ‘या’ दोन देशांत संसर्गात मोठी वाढ!

कोरोना महासाथीचा कहर जग अजूनही विसरलेले नाही. असे असतानाच आता या विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. आशिया खंडातील अनेक देशांत हा विषाणू वेगाने पसरत आहे.

| Updated on: May 16, 2025 | 11:45 PM
1 / 5
केरळ राज्यात गेल्या 24 तासात सर्वाधिक 114 रुग्ण आढळले. त्यानंतर कर्नाटकमध्ये 112 तर पश्चिम बंगालमध्ये 106 रुग्ण आहेत. सध्या केरळमध्ये 1,487 सक्रिय रुग्ण आहेत.

2 / 5
हाँगकाँगमधील सेंटर फॉर हेल्थ प्रोटेक्शनच्या संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमख अल्बर्ट आऊ यांनी हाँगकाँगच्या स्थितीविषयी सविस्तर सांगितलं आहे. त्यांनी सांगितल्यानुसार हाँगकाँगमध्ये कोरोनाचा प्रसार वाढला आहे. गेल्या वर्षानंतर यावेळी विषाणूच्या प्रसाराचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तीन महिन्यांत कोरोनाची लागण झालेल्या गंभीर रुग्णाची संख्या 31 पर्यंत पोहोचली आहे.

3 / 5
सिंगापूरमध्येही कोरोनाचा संसर्ग चांगलाच वाढला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या रिपोर्टनुसार 3 मेपर्यंत 28 कोरोनाग्रस्ताचे प्रमाण 28 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.  सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या 14 हजार 200 वर पोहोचली आहे. यावेळी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या 30 टक्क्यांनी वाढली आहे.

4 / 5
corona virus

corona virus

5 / 5
Covid 19 हा हळूहळू संपूर्ण देशात पसरत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाग्रस्त 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एका 5 महिन्याचे बाळ सुद्धा यामध्ये दगावले आहे. या 24 तासात कर्नाटक, दिल्लीत प्रत्येकी दोन आणि महाराष्ट्रात तीन रुग्ण दगावले. त्यात एका पाच महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे.