बॉक्स ऑफिसवर तब्बू, करीना, क्रितीची कमाल; ‘क्रू’ने कमावले तब्बल इतके कोटी रुपये

एकता कपूर आणि रिया कपूर निर्मित 'क्रू' हा चित्रपट गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झाला. चार दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. यामध्ये तब्बू, करीना कपूर आणि क्रिती सनॉनसोबतच दिलजित दोसांझ, कपिल शर्मा यांच्याही खास भूमिका आहेत.

| Updated on: Apr 02, 2024 | 10:11 AM
1 / 5
तब्बू, करीना कपूर आणि क्रिती सनॉन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'क्रू' या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला दमदार कमाई केली. प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4.50 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. 'गुड फ्रायडे'च्या सुट्टीच्या दिवशी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.

2 / 5
'क्रू'ने पहिल्याच दिवशी 10.28 कोटी रुपयांची कमाई केली होती. सुट्टीचा या चित्रपटाला चांगला फायदा झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 10.87 आणि तिसऱ्या दिवशी 11.45 कोटी रुपयांची कमाई झाली. गेल्या चार दिवसांत या चित्रपटाने भारतात 36 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

3 / 5
परदेशातही या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. पहिल्या वीकेंडपर्यंत जगभरात या चित्रपटाने 62 कोटी रुपये कमावले. सोमवारच्या कमाईचा आकडा समाविष्ट केल्यास 70 कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला या चित्रपटाने जमवला आहे.

4 / 5
ईदच्या मुहूर्तावर अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तोपर्यंत 'क्रू'ची बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई होऊ शकते. भारतात हा चित्रपट 70 ते 80 कोटी रुपयांपर्यंत कमावू शकतो, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

5 / 5
'क्रू'चा बजेट 75 कोटी रुपयांचा असून 15 कोटी रुपयांपर्यंत पब्लिसिटी आणि जाहिरातींवर खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटाचा एकूण बजेट 90 कोटी रुपयांच्या आसपास आहे.