Cyclone Shakti : भारताच्या दिशेनं प्रचंड वेगानं येतंय नवं संकट? …तर होणार मोठं नुकसान, आयएमडीचा हाय अलर्ट

देशावर एक मोठं संकट घोंगावत आहे, भारतामध्ये आणखी एक चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात सायक्लॉन शक्तिची निर्मिती होऊ शकते असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

| Updated on: May 14, 2025 | 5:26 PM
1 / 7
भारतामध्ये सध्या उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्रासह अनेक भागांमध्ये जोरदार अवकाळी पाऊस सुरू असल्याचं देखील चित्र पाहायला मिळत आहे. पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

2 / 7
याचदरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे देशावर एक मोठं संकट घोंगावत आहे, भारतामध्ये आणखी एक चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात सायक्लॉन शक्तिची निर्मिती होऊ शकते असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

3 / 7
भारतीय हवामान विभागाकडून बंगालाच्या उपसागरामध्ये शक्ति चक्रिवादळ निर्माण होऊ शकतं, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर मान्सून दाखल झाला आहे, या पार्श्वभूमीवर ही स्थिती महत्त्वाची असणार आहे.

4 / 7
एका रिपोर्टनुसार भारतीय हवामान विभागाकडून अंदमानच्या समुद्रात सायक्लोनिक सर्कुलेशनची नोंद करण्यात आली आहे. यामुळे 16 मे ते  22 मे पर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ शकतो.

5 / 7
अजून या स्थितीतचं चक्रीवादळात रुपांतर झालेलं नाही, मात्र याचं रुपांतर चक्रीवादळात झाल्यास, पुन्हा एकदा मोठा तडाखा बसण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाला शक्ती नाव देण्यात येणार आहे.

6 / 7
हवामान तज्ज्ञांच्या मतानुसार 23 मे ते 28 मे दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ शक्ती निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र या संदर्भात आयएमडीकडून आणखी अधिकृतरित्या कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाहीये.

7 / 7
दुसरीकडे महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे, पुढील चार ते पाच दिवस राज्याच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us