1972 चा किस्सा अन् बॉलिवूडचे शॉमेन राज कपूर एका मराठी माणसाला इतके घाबरे की स्वतच्याच… असं काय घडलं होतं?
बॉलिवूडमधील अनेक किस्से आजही आवर्जून ऐकले जातात. मात्र तुम्हाला माहिती आहे का, मराठी कलाकार आणि मराठी सिनेसृष्टी ही गेल्या अनेक दशकांपासून प्रेक्षकांचं सर्वाधिक प्रेम मिळवणाऱ्यांपैकी एक आहे. एक काळ होता जेव्हा बॉलिवूडचे शोमन मराठमोळ्या अभिनेत्याला इतके घाबरले, की त्यांनी मोठा निर्णय घेतला होता.
1 / 5

१९७२ चा काळ होता ज्यावेळी हिंदी चित्रपट तर गाजत होते, मात्र सर्वत्र आणखी एका नावाची हवा होती.
2 / 5
ते नाव म्हणजे दादा कोंडके, आणि ज्यांच्या नावावर थिएटरबाहेर हाऊसफुलचे बोर्ड लागायचे, त्या दादा कोंडकेंचाच हा भन्नाट किस्सा आहे.
3 / 5
त्यावेळी दादा कोंडकेंचा एकटा जीव सदा शिव हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची क्रेझ इतकी वाढली की अखेर थिएटरबाहेर हाऊसफुलचे बोर्ड झळकत होते.
4 / 5
याच दरम्यान बॉलिवूडचे दिग्गज राज कपूर त्यांचा मुलगा ऋषी कपूर यांचा पहिला चित्रपट लॉन्च करणार होते. या चित्रपटाचं नाव बॉबी असं होतं.
5 / 5
जेव्हा राज कपूर यांना कळलं की दादा कोंडकेंच्या चित्रपटाची लाट महाराष्ट्रभर धडकली आहे, तेव्हा त्यांनी आपलं पाऊल मागे घेतलं आणि स्वतःच्या लेकाचा चित्रपट पाच महिने पुढे ढकलला.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us