Dahi Handi 2026 : इवलुशा पोराकडून फ्लाइंग किस, तिचा ‘मुझे प्यार करो’ गाण्यावर डान्स; दहीहंडीच्या उत्सवात चाललंय काय?

Dahi Handi Viral Video : दहीहंडीच्या उत्सवादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. इवलुशा मुलाकडून फ्लाइंग किस आणि त्यानंतर 'मुझे प्यार करो' गाण्यावर महिलेचा डान्स पाहायला मिळत आहे.

| Updated on: Sep 05, 2026 | 6:25 PM
1 / 5
दहीहंडीचा उत्साहाला जबरदस्त रंग चढला आहे. गोविंदा थराथरावर थर चढवत आहेत. पण त्याचवेळी नामांकित दहीहंडी मंडळांच्या मंचावरील विविध गोष्टी चर्चेत येत आहेत.

दहीहंडीचा उत्साहाला जबरदस्त रंग चढला आहे. गोविंदा थराथरावर थर चढवत आहेत. पण त्याचवेळी नामांकित दहीहंडी मंडळांच्या मंचावरील विविध गोष्टी चर्चेत येत आहेत.

2 / 5

असाच एक प्रसंग एका मंडळाच्या मंचावर पाहायला मिळाला आहे. त्याच झालं असं की, विविध नृत्यांगणा या उत्सवात मंचावरुन गोविंदांचं आणि नागरिकांचं मनोरंजन करताना दिसत आहेत.

3 / 5

गौतमी पाटीलसह विविध प्रसिद्ध लावण्यवतींनी मंडळांचे मंच गजबजून गेले आहेत. विविध चित्रपट गीतांवर त्यांचे अल्लड नृत्य सुरु आहे. त्यांच्या खास ठेक्यावर नागरिकांनीही ठेका धरत प्रतिसाद दिला.

4 / 5

याचवेळी एक लहानसा मुलगाही गर्दीतून या नृत्यांगणेकडे पाहून फ्लाइंग किस भिरकावताना दिसत आहे. त्याला पाहून संबंधित नृत्यांगणाही अचंबित होऊन पाहताना दिसते आहे. त्यामुळे हा सगळा प्रकार सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

5 / 5

दरम्यान, त्याचवेळी दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये नेमकं काय चाललंय, असाही सवाल आता नेटकऱ्यांकडून उपस्थित होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us