6 March Horoscope : 3 राशींच्या नशिबात धनलाभ, जाणून घ्या काय काय घडणार?

शुक्रवारचा म्हणजेच 6 मार्चचा दिवस अनेक राशीच्या लोकांसाठी विशेष असणार आहे. तर काही लोकांच्या आयुष्यात काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणी काय काळजी घ्यावी, ते जाणून घेऊ या....

| Updated on: Mar 05, 2026 | 10:45 PM
1 / 5
शुक्रवारचा म्हणजेच 6 मार्चचा दिवस अनेक राशीच्या लोकांसाठी विशेष असणार आहे. तर काही लोकांच्या आयुष्यात काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणी काय काळजी घ्यावी, ते जाणून घेऊ या....

शुक्रवारचा म्हणजेच 6 मार्चचा दिवस अनेक राशीच्या लोकांसाठी विशेष असणार आहे. तर काही लोकांच्या आयुष्यात काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणी काय काळजी घ्यावी, ते जाणून घेऊ या....

2 / 5

मेष राशीच्या लोकांसाठी 6 मार्चचा दिवस चांगला असेल. उत्सव आणि सणांचे दिवस असल्याने कामाच्या ठिकाणी फारशी गडबड नसेल. आर्थिक स्थिती चांगली असेल. जोडीदारासोबतचे भांडण संपवण्याची हीच योग्य वेळ आहे. आरोग्य चांगले राहील.

3 / 5

वृषभ राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी चांगली बातमी मिळू शकते. या लोकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. तसेच लक्ष्मीमातेची कृपा राहील. मात्र पैसे खर्च करताना काळजी घ्या. सारासार विचार करायला हवा. वाहन चालवताना खबरदारी घ्या.

4 / 5

कर्क राशीच्या लोकांसाठी हा दिवस धापपळीचा असू शकतो. तसेच त्यामुळे योग्य ठिकाणी उर्जा लावावी. व्यापारात अनेक मोठे बदल करावे लागू शकतात. खर्च वाढेल. थोडेसे थकल्यासारखे वाटेल. त्यामुळे पुरेसा आराम करा. तुमचा मित्रच तुमचा घात करू शकतो. त्यामुळे खासगी बाबी कोणालाही सांगत बसू नका.

5 / 5

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us