Dawood Ibrahim Net Worth: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची एकूण संपत्ती किती? आकडा वाचून विश्वासच बसणार नाही
Dawood Ibrahim Net Worth: एकेकाळी डोंगरीमध्ये दादागिरी करणारा दाऊद आज हजारो कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. मात्र, मुंबईसह देशातील अनेक भागांतील त्याची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्याच्याकडे ह्युंदाई एक्सेंट (Hyundai Accent) सेडान कार देखील होती, जिचा लिलाव झाला आहे.

सध्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा चर्चेत आहे. त्याच्या भेंडी बाजार येथील घरावर बुलडोजर फिरवण्यात आला आहे. ही कारवाई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार झाली आहे. आता दाऊदच्या एकूण संपत्तीविषयी चर्चा सुरु झाली आहे. त्याच्याकडे एकूण किती संपत्ती आहे? चला जाणून घेऊया...
दाऊद इब्राहिम हे अंडरवर्ल्डच्या जगातील असे नाव आहे, जे भारतासह जगातील अनेक देशांसाठी डोकेदुखी बनले आहे. त्याच्या गुन्ह्यांची कहाणी खूप जुनी आहे. 'द गार्डियन'च्या रिपोर्टनुसार, १९८० आणि १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला दाऊद इब्राहिमने वेश्याव्यवसाय, जुगार आणि ड्रग्जच्या धंद्यातून अब्जावधी रुपयांचे साम्राज्य उभे केले.
'फोर्ब्स' मॅगझिनच्या रिपोर्टनुसार, दाऊद इब्राहिमकडे एकूण ६७० कोटी डॉलर (सुमारे ४३ हजार ५५० कोटी रुपये) इतकी संपत्ती आहे आणि जगातील टॉप ३ श्रीमंत डॉनच्या यादीत त्याचा समावेश आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम एकेकाळी मुंबईतील काळ्या धंद्याचा सम्राट होता. अवैध दारूपासून ते सोन्याच्या तस्करीपर्यंतचा व्यवसाय त्याच्या इशाऱ्यावर चालायचा, परंतु १९९३ च्या बॉम्बस्फोटात आरोपी झाल्यानंतर दाऊद येथून फरार झाला. तेव्हापासून आजपर्यंत तो भारताचा 'मोस्ट वॉन्टेड' गुन्हेगार आहे.
भारतातून गेल्यानंतर दाऊद आधी दुबई आणि नंतर पाकिस्तानातून आपले धंदे चालवत राहिला. काळानुसार दाऊदने आपले धंदेही बदलले. आज मुंबईच्या रिअल इस्टेट क्षेत्रात दाऊद आणि त्याच्या जवळच्या लोकांचा चांगलाच हस्तक्षेप आहे. गेल्या काही वर्षांपासून दाऊदने रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवला आहे. त्याची मालमत्ता भारत, पाकिस्तान आणि आखाती देशांमध्ये आहे.
दाऊदने रिअल इस्टेटच्या व्यवसायाच्या जोरावर अब्जावधी रुपये कमावले आहेत. देशातील दोन डझनाहून अधिक शहरांमध्ये त्याची मालमत्ता आहे. दाऊदच्या नावावर 'हॉटेल जायका' देखील आहे. दाऊदचे हे हॉटेल आता जप्त करण्यात आले आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात दाऊदची पहिली पसंती झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे (SRA) प्रकल्प आहेत.
अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने दाऊद इब्राहिमला दहशतवादी घोषित केले आहे. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील त्याच्या संशयित भूमिकेबद्दल २५ दशलक्ष डॉलरचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. दाऊदची पाकिस्तानमधील शहरात ३ आलिशान घरे आहेत. यापैकी एक ३० व्या डिफेन्स हाऊसिंग अथॉरिटीमधील हाऊस नंबर ३७ आणि क्लिफ्टन रोडवरील प्रसिद्ध 'व्हाईट हाऊस' आहे.