लेकीसोबत असताना दीपिकासमोर व्यक्तीने केलं असं काही..; भडकली अभिनेत्री

काही वेळानंतर हा व्हिडीओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून हटवण्यात आला. यावरून दीपिकाचे चाहते संबंधित व्यक्तीवर भडकले आहेत. पालकांच्या मर्जीशिवाय अशाप्रकारे फोटो किंवा व्हिडीओ काढणं चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलंय.

Updated on: Aug 25, 2025 | 3:58 PM
1 / 5
अभिनेत्री दीपिका पादुकोणने लग्नाच्या जवळपास सहा वर्षांनंतर मुलगी दुआला जन्म दिला. 8 सप्टेंबर 2024 रोजी दीपिका-रणवीरच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं. परंतु आतापर्यंत त्यांनी त्यांच्या मुलीचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही.

2 / 5
दीपिका आणि रणवीरने पापाराझींकडे विनंती करून त्यांच्या मुलीचे फोटो क्लिक न करण्याची विनंती केली आहे. मुलीने सर्वसामान्यांसारखं आयुष्य जगावं, फोटोग्राफर्स किंवा पापाराझींचं दडपण तिच्यावर येऊ नये, म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला.

3 / 5
असं असतानाही एका व्यक्तीने लपून दीपिकाच्या मुलीचा व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केला. त्या व्यक्तीवर दीपिका चांगलीच चिडली होती.

4 / 5
दीपिका तिच्या मुलीसोबत मुंबई एअरपोर्टवर होती. तेव्हा एका व्यक्तीने हळूच तिच्या मुलीचा व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केला. त्याला व्हिडीओ रेकॉर्ड करताना पाहताच दीपिका संकोचल्यासारखी झाली. तिने तोंडावर मास्क लावला होता.

5 / 5
दीपिका रागाने त्या व्यक्तीकडे पाहते आणि त्याला मोबाइल खाली करण्याचा इशारा करते. तिने स्पष्ट नकार दिल्यानंतरही संबंधित व्यक्ती दीपिका आणि तिच्या मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करतो. या व्हिडीओमध्ये दुआचा चेहरा स्पष्ट पहायला मिळत आहे.