फ्रीजरमधील बर्फाचा डोंगर कसा वितळवायचा? फ्रीजचं नुकसान न करता असा करा डीफ्रॉस्ट
तुमच्या फ्रीजरमध्ये बर्फाचा थर साचला असेल तर ती केवळ सामान्य घाण नाही, तर फ्रीजच्या कार्यक्षमतेसाठी धोकादायक आहे. योग्य काळजी घेऊन फ्रीजची कार्यक्षमता टिकवून ठेवा.

रेफ्रिजरेटर ज्याला आपण सर्वसामान्यपणे फ्रीज म्हणतो, हे स्वयंपाकघरातील असं उपकरण आहे, जो 24 तास सतत कार्यरत असतो. अन्नपदार्थ आणि पेये दीर्घकाळ ताजं ठेवण्यासाठी फ्रीज सतत थंड राहणे आवश्यक असतं. (Image Source | iStock)
परंतु अनेकदा फ्रीजमध्ये काही समस्या निर्माण होतात, पण लोकं सामान्य गोष्ट समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यापैकी एक म्हणजे फ्रीजरमध्ये बर्फ साचण्याची समस्या. जर तुमच्या जुन्या फ्रीजच्या फ्रीजरमध्ये हळूहळू बर्फाचा जाड, डोंगरासारखा थर तयार होऊ लागला असेल, तर त्याकडे केवळ सामान्य घाण समजून दुर्लक्ष करू नका.
फ्रीज बंद करून बर्फ वितळू द्या - फ्रीजचा स्विच बंद करून प्लग काढा आणि सर्व सामान बाहेर काढून आईस पॅक असलेल्या कूलरमध्ये ठेवा. फ्रीजरच्या खाली टॉवेल अंथरून त्याचा दरवाजा उघडा ठेवा. बर्फ वितळल्यानंतर प्लास्टिकच्या स्पॅच्युलाने तो हळूवारपणे साफ करा.
मात्र, बर्फ काढण्यासाठी कधीही चाकू किंवा कोणतीही धारदार धातूची वस्तू वापरू नका. त्यामुळे कूलिंग लाइनचं नुकसान होऊ शकते.
कोमट पाण्याची मदत घ्या - फ्रीज बंद करून आणि अनप्लग केल्यानंतर फ्रीजरमध्ये कोमट पाण्याचे एक भांडं ठेवा. त्यातून निर्माण होणाऱ्या वाफेमुळे बर्फाचा थर लवकर सैल होण्यास मदत होऊ शकते. पाणी थंड झाल्यावर ते बदलू शकता. मात्र, पाणी थेट फ्रीजरच्या भिंतीवर किंवा इलेक्ट्रिकल भागांवर पडणार नाही याची काळजी घ्या.
फ्रीजरचा दरवाजा उघडा ठेवा - फ्रीजचा प्लग काढून त्याचा दरवाजा उघडा ठेवा आणि बाहेरील हवा आत जाऊ द्या. खोलीच्या तापमानाची हवा बर्फ वितळण्यास मदत करू शकते.
बर्फ पूर्णपणे वितळल्यानंतर फ्रीजर कोरडा करा - बर्फ पूर्णपणे वितळल्यानंतर फ्रीजर आतून व्यवस्थित पुसून कोरडा करा. त्यानंतरच फ्रीज पुन्हा सुरू करा.
सामान ठेवण्यापूर्वी फ्रीजर थंड होऊ द्या - फ्रीज पुन्हा सुरू केल्यानंतर फ्रीजरला योग्य प्रकारे थंड होण्यासाठी थोडा वेळ द्या. त्यानंतरच त्यामध्ये अन्नपदार्थ आणि इतर सामान ठेवा.
सामान ठेवण्यापूर्वी फ्रीजर थंड होऊ द्या - फ्रीज पुन्हा सुरू केल्यानंतर फ्रीजरला योग्य प्रकारे थंड होण्यासाठी थोडा वेळ द्या. त्यानंतरच त्यामध्ये अन्नपदार्थ आणि इतर सामान ठेवा.
(डिस्क्लेमर : वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही प्राथमिक स्वरूपाची आहे. ती उपलब्ध स्रोतांवरून देण्यात आलेली आहे.TV9 मराठी या माहितीची पुष्टी करत नाही )