
पुरेसं पाणी आपल्याला अनेक रोगांपासून लांब ठेवते. रोज तुम्ही जर योग्य प्रमाणात पाणी प्यायलं तर अनेक रोगांपासून तुम्हाला मुक्ती मिळते किंवा अनेक रोग तुमच्या आजूबाजूला सुद्धा फिरकू शकत नाहीत. पाण्याचे योग्य प्रमाण जर शरीरात असेल तर हिरड्यांचा रक्तस्त्राव आटोक्यात येईल.

हिरड्यांचा रक्तस्त्राव थांबवायचा असेल. दातांचंही दुखणं थांबवायचं असेल तर मिठाचं पाणी हा उत्तम उपाय आहे. गरम पाण्यात मीठ मिसळलं आणि त्याने गुळण्या केल्यास बराच फरक पडतो. या त्रासातून आराम मिळतो.

अचानक जर रात्री हा त्रास व्हायला लागला. झोपल्यावर हिरड्यांमधून रक्तस्त्राव होत असेल तर रक्त गोठवण्यासाठी तुम्ही कडूलिंबाचं तेल त्याठिकाणी लावू शकता. ज्या ठिकाणी रक्तस्त्राव होतोय तिथे तेल लावलं आणि झोपलात की बरं वाटेल.

कोरफडीचा रस अनेक समस्यांवर चांगला उपाय असतो. हा रस जर तुम्ही हिरड्यांवर लावला तर तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. या पानांचा रस काढा आणि तो हिरड्यांवर लावा.

नुसत्या बाहेरच्या गोष्टींनी काही होत नाही. या समस्येवर तुम्हाला जर चांगला उपाय हवा असेल तर तुम्ही आहारात सुद्धा काही गोष्टींचा समावेश करणं गरजेचं आहे. ताजी फळे आणि भाज्या हिरड्यांसाठी खूप फायदेशीर ठरतात. फळे आणि भाज्या हिरड्यांचे आरोग्य सुधारू शकतात.