
ताज लेक पॅलेस : राजस्थानच्या उदयपूरमध्ये हे ताज लेक पॅलेस हॉटेल आहे. तळ्या काठी असलेलं हे हॉटेल प्रचंड लोकप्रिय आहे. आधी हा एक महल होता. नंतर त्याचं रुपांतर हॉटेलमध्ये करण्यात आलं. हे हॉटेल डेस्टिनेशन वेडिंगसाठी चांगला पर्याय आहे.

रामबाग पॅलेस : रामबाग पॅलेस हा जयपूरच्या महाराजांचं निवासस्थान होतं. त्यामुळे या पॅलेसचं काम अतिशय आखीवरेखीव आहे. हा पॅलेस म्हणजे जयपूर शहराचा अमुल्य दागिना आहे. हा जगातील सर्वात सुंदर पॅलेस राजवाडा आहे.

उमेद पॅलेस : उमेद पॅलेस हा राजस्थानच्या जोधपूरमध्ये आहे. हे खूपच सुंदर हॉटेल आहे. डेस्टिनेशन वेडिंगसाठी हे हॉटेल प्रसिद्ध आहे.

नीमाराना फोर्ट : नीमाराना फोर्ट हा देखील आधी राजवाडा होता. आता इथं लोक सुट्टी इन्जॉय करायला येतात. हा देखील डेस्टिनेशवन वेडिंगसाठी चांगला पर्याय आहे.

फलकनुमा पॅलेस : फलकनुमा याचा अर्थ आकाश आणि आकाशातील चमचमता तारा... हैदराबादमध्ये असलेला हा फलकनुमा पॅलेस प्रचंड सुंदर आहे. चार मिनारपासून केवळ 5 किलोमीटर लांब हा पॅलेस आहे. नावाप्रमाणेच हा राजवाडा आहे. हा देखील डेस्टिनेशन वेडिंगसाठी चांगला पर्याय आहे.