वाराणसीत पोहोचला ‘देवमाणूस’; किरण गायकवाडचा हा अंदाज पाहण्यासाठी चाहते उत्सुक

'देवमाणूस: मधला अध्याय' ही बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित मालिका येत्या 2 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दररोज रात्री 10 वाजता झी मराठी वाहिनीवर ही मालिका प्रसारित होणार आहे.

| Updated on: May 27, 2025 | 1:24 PM
1 / 8
झी मराठी वाहिनीवर ‘देवमाणूस- मधला अध्याय’ या मालिकेचा प्रोमो प्रसारीत झाला आणि देवमाणूसच्या या सिझनमध्ये काय नवीन पाहायला मिळणार,  यात कोणते कलाकार असणार, याची सगळीकडे चर्चा  सुरू झाली. यामध्ये मुख्य भूमिकेत अभिनेता किरण गायकवाड दिसणार आहे.

2 / 8
नुकतंच या मालिकेचं शूटिंग वाराणसीमध्ये पार पडलं होतं. त्याविषयी किरण म्हणाला, "वाराणसीतील शूटिंगचा अनुभव खूप कमाल होता. खरं तर ही गोष्ट माझ्या बकेटलिस्टमध्ये होती. कधीतरी मी वाराणसीला जावं, अशी माझी खूप इच्छा होती."

3 / 8
"तिकडच्या भाषेचा एक लहेजा आहे. गंगा किनार आणि घाटांचं सौंदर्य अनुभवायचं होत. जसं मला कळलं की वाराणसीला शूटिंग आहे, तेव्हा माझा उत्साह अधिक वाढला. मागच्या सिझनमध्ये आम्ही राजस्थानमध्ये शूट केलं होतं. तेव्हा मला तिकडची भाषा शिकायला मिळाली आणि राजस्थानी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता आला," असं तो पुढे म्हणाला.

4 / 8
वाराणसीतील शूटिंगबद्दल त्याने पुढे सांगितलं, "आम्ही तीन-चार दिवसांसाठी वाराणसीला शूटिंग केलं होतं. त्यामुळे टाईमलाइन खूप कट टू कट होती. आम्ही ज्या ठिकाणंवर शूटिंग करत होतो, तिकडची माणसं मला ओळखत होती. कारण या आधीचे सिझन हिंदीमध्येही डब झाले आहे. त्यामुळे देवमाणूसचा प्रेक्षक तिथेही होता."

5 / 8
"वाराणसीच्या गल्लीमध्ये  मी चढावर आठ-नऊ किलोमीटर सलग सायकल चालवली आहे. खूप भयंकर हाल झाले होते माझे. सायकल जोरात चालवायची होती आणि त्यात सायकलची चेनही निघत होती. दोन-तीन वेळा मी पडता पडता वाचलो. तिकडे गर्दीही होती."

6 / 8
"हे सर्व एके ठिकाणी होत असताना भान ठेवणं की आपण एक पात्र साकारत आहोत ती एक वेगळी कसरत होती. मी पहिल्यांदाच वाराणसीला गेलो होतो. माझ्यासाठी सर्वच नवीन होतं. तिकडे मणिकर्णिका घाट आहे, राजा हरिश्चंद्र घाट आहे. सर्वांना एकत्र गंगा आरतीमध्ये तल्लीन होताना मला बघायच होतं."

7 / 8
"हा सर्व अनुभव तुम्हाला देवमाणसामध्ये त्याच्या काही छटा दिसतील. मी हे सर्व अनुभवायला दोन दिवस आधीच पोहोचलो होतो. कारण मला त्या जागेचा, तिकडच्या भाषेचा आणि लोकांच्या वावरण्याचा अभ्यास करायचा होता. माझ्या अभ्यासादरम्यान मी गंगाघाट पूर्ण फिरलो."

8 / 8
"मला जितकी माहिती सांगितली गेली त्याप्रमाणे तिथे चौऱ्यांशी घाट आहेत, त्यातले  ८० घाट तर मी नक्कीच फिरलो. तिथली एक स्पेशल पहलवान लस्सी आणि कचोरी  आहे ती मला खूप आवडली. नाव घेतलं तरी ती चव माझ्या जिभेवर रेंगाळत आहे. मी माझ्या आई आणि बायकोसाठी लूम मधून काही साड्याही खरेदी केल्या."