Dhurandhar : थिएटरनंतर आता ओटीटीवर ‘धुरंधर’चा धुमाकूळ; कधी अन् कुठे होणार स्ट्रीम?

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ब्लॉकबस्टर ठरलेल्या या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. रणवीर सिंह, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, राकेश बेदी यांच्या दमदार कामगिरीचं कौतुक होत आहे.

| Updated on: Dec 23, 2025 | 4:58 PM
1 / 5
सध्या थिएटरपासून सोशल मीडियापर्यंत.. सर्वत्र आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' या चित्रपटाचीच चर्चा आहे. जर तुम्ही हा चित्रपट अद्याप थिएटरमध्ये पाहू शकला नाहीत, तर काळजी करू नका. कारण लवकरच हा चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्मने या चित्रपटाचे डिजिटल राइट्स विकत घेतले आहेत.

2 / 5
बॉक्स ऑफिसवर अजूनही हा चित्रपट जोरदार कमाई करतोय. मोठ्या शहरांमध्ये 'धुरंधर'चे शोज हाऊसफुल आहेत. अभिनेता रणवीर सिंहच्या करिअरमधील हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. अत्यंत कमी दिवसांत कमाईचा 500 कोटींचा टप्पा पार करणारा हा दुसरा चित्रपट ठरला आहे.

3 / 5
'धुरंधर'ला मिळणारं यश आणि त्याची लोकप्रियता पाहून नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मने लगेच या स्पाय थ्रिलरचे डिजिटल राइट्स विकत घेतले आहेत. हा चित्रपट नवीन वर्षात म्हणजेच 30 जानेवारी 2026 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

4 / 5
मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचा तेलुगू व्हर्जनसुद्धा प्रदर्शित केला जाऊ शकतो. या चित्रपटात रणवीर सिंह, अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन आणि राकेश बेदी यांच्या भूमिका आहेत.

5 / 5
'धुरंधर' हा चित्रपट 5 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित झाला. रेहमान डकैतच्या भूमिकेतील अक्षय खन्नाच्या परफॉर्मन्स प्रेक्षक-समीक्षकांकडून प्रचंड कौतुक होतंय. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात कमाईचा 700 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.