माणसाचे मांस खाणारी जगातील एकमेव डाळ माहितीये का? आपल्या रोजच्या जेवणात आहे समावेश

तुम्हाला माहित आहे का एका डाळीला 'माणसाचे मांस' खाणारी डाळ असे म्हटले जाते. या डाळीचा आपल्या रोजच्या जेवणात देखील समावेश आहे. पण आता ही डाळ कोणती आहे आणि यामध्ये किती तथ्य आहे चला जाणून घेऊया...

| Updated on: May 14, 2026 | 3:55 PM
1 / 7
'एक डाळ माणसाचे मांस खाते' हे विधान ऐकून कोणालाही धक्का बसणे स्वाभाविक आहे. विशेष म्हणजे, भारतीय प्रशासकीय सेवेच्या (IAS) मुलाखतीत हा प्रश्न विचारला गेल्याने याची चर्चा अधिक रंगली. या डाळीचा वापर आपण रोजच्या जेवणात देखील करतो. चला जाणून घेऊया ही डाळ कोणती आहे...

'एक डाळ माणसाचे मांस खाते' हे विधान ऐकून कोणालाही धक्का बसणे स्वाभाविक आहे. विशेष म्हणजे, भारतीय प्रशासकीय सेवेच्या (IAS) मुलाखतीत हा प्रश्न विचारला गेल्याने याची चर्चा अधिक रंगली. या डाळीचा वापर आपण रोजच्या जेवणात देखील करतो. चला जाणून घेऊया ही डाळ कोणती आहे...

2 / 7

आम्ही ज्या डाळीविषयी बोलत आहोत ती दुसरी तिसरी कोणती डाळ नसून सर्वांच्या आवडीची 'हिरवी मूग डाळ' आहे. पण तिला 'मांसाहारी' किंवा 'मांस खाणारी' डाळ का म्हटले जाते? चला यामागचे वैज्ञानिक सत्य जाणून घेऊया.

3 / 7

मूग डाळ प्रत्यक्षात कोणाचे मांस खात नाही, तर हे केवळ एका शास्त्रीय प्रक्रियेचे वर्णन करण्यासाठी वापरलेला वाक्प्रचार आहे. मूग डाळीमध्ये ‘प्रोटीओलाइटिक एन्झाईम्स’ (Proteolytic Enzymes) नावाचे विशेष प्रथिने आढळतात.

4 / 7

या एन्झाईम्सचे मुख्य कार्य शरीरातील टाकाऊ घटक पचवणे हे असते. जेव्हा आपण ही डाळ खातो, तेव्हा हे एन्झाईम्स शरीरात जमा झालेली अतिरिक्त चरबी (Fat) आणि मृत पेशी (Dead Cells) नष्ट करण्यास मदत करतात. या प्रक्रियेमुळेच गमतीने याला 'माणसाचे मांस खाणारी डाळ' असे म्हटले जाते, कारण ती शरीरातील अनावश्यक मांस (चरबी) जाळून टाकते.

5 / 7

मूग डाळ ही सर्वात पौष्टिक आणि सहज पचणारी डाळ मानली जाते. याचे अनेक फायदे खालीलप्रमाणे आहेत. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त, प्रथिनांचा खजिना, यात भरपूर फायबर असल्याने पचनसंस्था सुधारते आणि पोट बराच काळ भरलेले राहते, मुगामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते, जे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

6 / 7

मूग डाळीचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे. असे मानले जाते की, सुमारे ४ हजार वर्षांपूर्वी सध्याच्या कर्नाटक परिसरात मुगाचा शोध लागला होता.

7 / 7

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us