
इराणचे जूने नाव “पर्शिया” आहे. साल 1935 हे नाव बदलून “इराण” असे ठेवण्यात आले,याचा अर्थ आहे “आर्यांची भूमी ”.

इराणची संस्कृती सर्वात जून्या संस्कृतीपैकी एक आहे. येथे 7,000 वर्षे जुन्या मानवी वस्तींचे अवशेष मिळाले आहे.

इराणचा ऑईल रिझर्व्हचा विचार करता हा जगातला चौथा असा मोठा देश आहे ज्याच्याकडे सर्वाधिक तेल भंडार आहे. ज्याचा व्हॉल्युम 157.8 बिलियन बॅरल आहे. या क्रूड ऑईलची मार्केट व्हॅल्यू सुमारे 12 ट्रिलियन डॉलर आहे

फास्ट फूड्स ब्रँड्सना इराणमध्ये बंदी आहे. इराणमध्ये मॅकडोनाल्ड्स आणि केएफसी बॅन आहे. परंतू तेथे “Mash Donald’s” वा “ZFC” सारखे नकली ब्रँड आढळतील

इराणचा गोल्ड रिझर्व्हच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत ऑईल आहे. याच बळावर इराणने त्याच बळावर गोल्ड रिझर्व्ह 320 मे.टन आहे.

फारसी भाषेची गोडी - इराणची अधिकृत भाषा फारसी (पर्शियन) आहे,जी साहित्य आणि शायरीसाठी ओळखली जाते.प्रसिद्ध शायर ओमर खय्याम आणि हाफिज़ इकडचेच होते.

इराणमध्ये मद्यावर बंदी आहे. दारु पिणे आणि विकणे कायदेशीर गुन्हा आहे. परंतू ब्लॅक मार्केटमधून काही जण मद्य खरेदी करत असतात.

जगातील सर्वात जूनी वाईन बनविण्याचे पुरावे येथे आढळले आहेत. संशोधकांनी इराणमध्ये 7,000 वर्षांपूर्वी मद्य बनविण्याचे अवशेष मिळाले आहेत.ही जगातील सर्वात जूनी वाईन परंपरा म्हटली जाते

येथे होळी सारखाच चहार शंभे सूरी सण साजरा केला जातो. या सणाला “चहार शंभे सूरी”,म्हटले जाते यात लोक आगीच्यावर उड्या मारतात. हा सण होळीशी मिळता जुळता आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला हा सण साजरा होतो.

इराणमध्ये महिलांसाठी खास ड्रेस कोड ठेवलेला आहे. येथे महिलांना सार्वजनिक जागी हिजाब परिधान करणे बंधनकारक आहे. महिलांना डोके झाकल्याशिवाय घराबाहेर पडणे कायद्याने गुन्हा आहे.