
अभिनेत्री दिशा पाटनी आणि पंजाबी सिंगर तलविंदर सिंह या दोघांनी आपले नाते असल्याचे जवळपास घोषीत केले आहे. या कपलला मुंबईत लोलापालूजा इंडिया इव्हेंटमध्ये हातात हात घालून एकत्र फिरताना पाहिले गेले आहे. अखेर दोघांनी आपले नाते पब्लिक केले आहे. त्यामुळे आता त्यांच्या डेटींगच्या अफवांना पूर्णविराम लागला आहे.

गर्दीत सर्वांसमोर हातात हात घालून एकत्र चालणे आणि कॅमेऱ्यापासून न लपणे यावरुन अभिनेत्री दिशा पाटनी आणि पंजाबी सिंगर तलविंदर सिंह या दोघांच्या चाहत्यांना साफ संकेत मिळाले आहेत. त्यांचा हा एकत्र चालतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.चाहत्यांनी या कपलचा ऑफीशियल डेब्यु असे या व्हिडीओला म्हटले आहे.

दिशा आणि तलविंदर यांचे नाते गेले काही दिवस त्यांच्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहे.या महिन्याच्या सुरुवातीलाच दोघे उदयपूर येथील नुपुर सेनन आणि स्टेबिन बेन यांच्या लग्नात एकत्र दिसले होते. त्यावेळी त्यांनी मीडियापासून स्वत:ला लपवले होते आणि एकत्र फोटो न येण्याची पुरेपूर काळजी घेताना दिसले. तलविंदर याला अभिनेत्री मौनी रॉय सोबत चालताना पाहिले गेले, तर मौनी हीचे पती दिशासोबत उभे होते.

असे म्हटले जात होते की दिशा आणि दलविंदर जाणून बुजून मीडियाला एकत्र पोज देत नव्हते, त्यामुळे या दोघांच्या नात्याविषयी वावड्या सुरु झाल्या होत्या. लोलापालूजा इंडियात त्यांच्या एकत्र हजेरीने या वावड्यांना पूर्णविराम लागला आहे. इव्हेंट संपल्यानंतरही दोघे एकाच कारमधून जाताना स्पॉट झाले आहेत. यावेळी मात्र त्यांनी कॅमेऱ्यापासून वाचण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. त्यावरुन स्पष्ट झाले आहे की दोघेही आता नाते लपवू इच्छीत नाहीत. चाहत्यांनी या दोघांच्या नात्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

तलविंदर सिंह सिद्धू,याला म्युझिक इंडस्ट्रीत तलविंदर नावाने ओळखले जाते. तो एक प्रसिद्ध पंजाबी गायक, गीतकार आणि संगीत दिग्दर्शक आहे. त्याचा जन्म नोव्हेंबर १९९७ मध्ये पंजाबच्या तरनतारन येथे झाला होता. आणि अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्कोच्या बे एरियात त्यांचे बालपण गेले आहे.

गायक तलविंदर संगीतात हिप-हॉप, आर एण्ड बी, ट्रॅप आणि सिंथ - पॉप सारखे ग्लोबल म्युझिक स्टाईल्सला पंजाबी संगितात एकत्र करतो. तो नेहमीच चेहऱ्याला पेंट लावून परफॉर्म्स करतो. ज्यामुळे तो त्याची पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ स्वतंत्र राखण्याचा एक प्रयत्न करत असतो.