
लग्न हे पवित्र बंधन मानले जाते. ज्या लोकांचे अद्याप लग्न झालेले नाही, त्यांना याचे गांभीर्य नसते. पण जे विवाहित आहेत, त्यांना या नात्याचे महत्त्व चांगलेच माहिती आहे. कोणत्याही कठीण परिस्थितीत विवाहबंधन टिकवून ठेवणे ही तारेवरची कसरत असते. जगभरात दररोज कोट्यवधी लोक विवाहबंधनात अडकतात, तशीच अनेक लोक घटस्फोटही घेत असतात.

जगातील सर्वाधिक घटस्फोट होणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिकेचे नाव आहे. अमेरिकेत 46 टक्के लोकांचे घटस्फोट होतात.

जगातील सर्वाधिक घटस्फोट घेणाऱ्या देशांमध्ये रशिया हा चौथ्या क्रमांकावर आहे. रशियामध्ये 51 टक्के लोकांची लग्न मोडतात

युरोपमधील सर्वात सुंदर देशांपैकी एक असलेल्या फ्रान्समध्ये घटस्फोटाचे प्रमाण हे 55 टक्के आहे. फ्रान्स हा देश या यादीत तिसऱ्या क्रमांकावर येतो.

जगातील सर्वाधिक घटस्फोट घेणारा देश म्हणून स्पेनची ओळख आहे. या देशात घटस्फोटाचे प्रमाण 65 टक्के आहे.

युरोपियन देश लक्झमबर्गमध्ये सर्वाधिक लग्न मोडली आहे. या ठिकाणी घटस्फोटाचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. लक्झमबर्गमध्ये 87 टक्के घटस्फोट होतात. लक्झमबर्गचे नाव नेहमी सर्वाधिक घटस्फोट घेणाऱ्या देशांच्या यादीत अव्वल असते. त्यामुळे युरोपियन देशांमध्ये जगात सर्वाधिक घटस्फोटाचे प्रमाण असल्याचे स्पष्ट दिसत आहे.