अख्खा देश मुस्लिम तरी असतो, दिवाळीचा थाट, किती देशांमध्ये साजरा होतो सण? एका देशा तर शासकीय सुट्टीच
दिवाळीचा सण आता भारतापुरता मर्यादित राहिलेला नाही.भारतासह काही मुस्लिम देशांमध्येही हा सण उत्साहात साजरा केला जातो. काही देशांमध्ये तर सार्वजनिक सुट्टी असते, तर काही ठिकाणी भारतीय समुदाय मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करतो.
1 / 5

मलेशियामध्ये दिवाळीला हरि दीपावली म्हणतात. सरावक प्रांत वगळता देशात सार्वजनिक सुट्टी असते. भारतीय समुदाय मिठाई वाटून आनंद साजरा करतो.
2 / 5
इंडोनेशियातील बाली बेटावर दिवाळी उत्साहात साजरी होते. येथे हिंदू लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, संपूर्ण देशात अधिकृत सुट्टी नसते.
3 / 5
दुबईमध्ये दिवाळीनिमित्त आकर्षक रोषणाई केली जाते. बुर्ज खलिफावर विशेष प्रकाशयोजना पाहायला मिळते. विविध ठिकाणी दिवाळी मेळेही भरवले जातात.
4 / 5
संयुक्त अरब अमिरातीमध्ये मोठ्या संख्येने भारतीय राहतात. दिवाळीला अधिकृत सरकारी सुट्टी नसते. तरीही भारतीय समुदाय हा सण उत्साहाने साजरा करतो.
5 / 5
ओमान, कतार आणि बहरीनमध्येही दिवाळी साजरी केली जाते. भारतीय नागरिक घरी आणि मंदिरांमध्ये दिवे लावतात. पूजा-अर्चा करून सणाचा आनंद घेतात.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us