मोठी बातमी! विधान परिषद निवडणूक निकाल, भाजपनं खातं उघडलं, पहिला विजय
आज राज्यात पाच विधान परिषदेच्या जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. यामध्ये तीन पदवीधर तर दोन शिक्षक मतदारसंघाचा समावेश आहे. दरम्यान महाराष्ट्रासोबतच इतरही राज्यांमध्ये आज विधान परिषदेच्या जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. याच दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे.

आज राज्यातील पाच जागांवरील विधान परिषद निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. 23 ऑक्टोबर रोजी मतदान पार पडलं होतं. त्यानंतर आता मतमोजणी सुरू असून, आकडेवारी हाती येण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात अमरावती शिक्षक मतदारसंघ, पुणे शिक्षक मतदारसंघ, मराठवाडा पदवीधर मतदारसंंघ, नागपूर पदवीधर मतदारसंघ आणि पुणे पदवीधर मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आकडे वेगाने बदलत असल्यामुळे उमेदवारांसोबतच त्यांच्या समर्थकांची देखील धाकधूक वाढली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या मतांच्या आकडेवारीनुसार राज्यात तीन ठिकाणी महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत, ज्यामध्ये नागपूर पदवीधर मतदारसंघ, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि पुणे शिक्षक मतदारसंघ यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार दोन ठिकाणी आघाडीवर आहेत, ज्यामध्ये पुणे पदवीधर मतदारसंघ आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा समावेश आहे.
दरम्यान ज्याप्रमाणे महाराष्ट्रात आज विधान परिषदेच्या जांगासाठी मतमोजणी सुरू आहे. त्याचप्रमाणे बिहारसह इतर राज्यांमध्ये देखील आज विधान परिषदेंच्या जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. आता बिहारमधून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे बिहारमध्ये भाजपने विजयाचं खातं उघडलं आहे. बिहारच्या तिरहूत शिक्षक मतदारसंघामधून भाजपचे उमेदवार नरेंद्र प्रसाद सिंह यांचा विजय झाला आहे. त्यांनी 594 मतांनी सीपीआयचे उमेदवार संजय सिंह यांचा पराभव केला आहे. आता फक्त विजयाची अधिकृत घोषणाच बाकी आहे.
हा सीपीआयसाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. कारण या शिक्षक मतदारसंघातून सीपीयाचे संजय सिंह हे दोनदा आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. याचबरोबर भाजपचे आपल्या विजयाचं पहिलं खातं ओपन केलं आहे, बिहारमध्ये भाजपला पहिला विजय मिळाला आहे.
महाराष्ट्रात काय स्थिती?
दरम्यान दुसरीकडे महाराष्ट्रात अजूनही मतमोजणी सुरूच आहे. पुणे शिक्षक मतदारसंघामधून भाजपचा उमेदवार आघाडीवर आहे, तर अमरावती शिक्षक मतदारसंघामधून शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार आघाडीवर आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघामधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार प्रतापसिंह पाटील हे आघाडीवर आहेत.
